आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला, पण या सामन्यात भारतीय युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने मैदान मारलं. ईशानने या सामन्यात झंझावाती फलंदाजी करत 82 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ चांगल्या स्थितीत पोहोचला. या खेळीनंतर त्याच्यावर क्रिकेटविश्वाने कौतुकाचा वर्षाव पाडला. मात्र, एका सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. खरं तर, ईशानच्या डावादरम्यान एका मॉडेलने त्याचा फोटो क्लिक करून हार्ट इमोजीसह इंस्टाग्राम स्टोरी टाकली. यानंतर ईशान आणि मॉडेलमध्ये काही आहे, की मॉडेलचे हे प्रेम सामान्य चाहत्याप्रमाणे आहे, अशा चर्चांना उधाण आले.
मॉडेलसोबतच्या अफेअरची चर्चा सुरू होण्यामागील कारण म्हणजे या मॉडेलला अनेकदा ईशान किशन (Ishan Kishan) याच्यासोबत पाहिले गेले आहे. अनेकजण तिला ईशानची गर्लफ्रेंड म्हणत आहेत. या मॉडेलच्या इंस्टा स्टोरीवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोण आहे मॉडेल?
ईशान किशन याचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करणारी मॉडेल इतर कुणी नसून ईशान किशनची कथित गर्लफ्रेंड आदिती हुंडिया (Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia) आहे. मागील काही काळापासून तिचे नाव किशनसोबत जोडले जात आहे. शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान जेव्हा ईशान धमाकेदार फलंदाजी करत होता, तेव्हा आदितीने त्याचा एक फोटो क्लिक करून इंस्टाग्रामवर शेअर केला.
या फोटोत आदिती हुंडिया (Aditi Hundia) लिव्हिंग रूममध्ये दिसत आहे, जिथे एक मोठा एलईडी टीव्ही लावण्यात आला आहे. टीव्हीवर भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामना सुरू आहे आणि स्क्रीनवर ईशान फलंदाजी करताना दिसत आहे. इंस्टा स्टोरी शेअर करत आदितीने कॅप्शनमध्ये लिहिले, “स्वप्नवत खेळी, तू प्रत्येक गोष्टीसाठी पात्र आहेस.” यामध्ये आदितीने हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.

आदिती हुंडियाविषयी थोडक्यात
आदिती हुंडिया ही पेशाने मॉडेल आहे. तिने 2017मध्ये ‘मिस इंडिया कॉन्टेस्ट’मध्ये भाग घेतला होता. तसेच, ती फायनलिस्टदेखील होती. यानंतर तिने 2018मध्ये ‘मिस सुपरनॅशनल’ हा किताबही जिंकला. ईशान आणि आदिती हुंडिया अनेकदा एकत्र दिसले आहेत.
ईशानची खेळी
खरं तर, शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ईशान किशन याने 81 चेंडूंचा सामना करताना 82 धावांची खेळी साकारली. ही खेळी त्याने अशा वेळी साकारली, जेव्हा भारतीय संघाच्या चार विकेट्स 66 धावसंख्येवर पडल्या होत्या. यानंतर ईशानने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 138 धावांची शानदार भागीदारी रचली होती. तसेच, भारताला 266 धावांपर्यंत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. (cricketer ishan kishan rumoured girlfriend aditi hundia show love on insta story asia cup 2023 india vs pakstan match)
हेही वाचा-
रोहित-विराटच्या विकेटमुळे भारतीयांचा जीव पडलेला भांड्यात, पण पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय, ‘बरंच झालं…’
इरफानने उडवली पाकिस्तानची खिल्ली, PAK चाहत्यांना येईल राग, तर भारतीय क्रिकेटप्रेमी होतील खुश; लगेच वाचा