आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाने पाणी फेरले. पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. मात्र, या सामन्यात भारतीय संघ पूर्ण डाव खेळू शकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा चोपल्या होत्या. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करण्याची पाकिस्तानला संधी मिळाली नाही. शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले, पण भारताची वरची फळी पत्य्याच्या बंगल्यासारखी कोसळल्यानंतर ईशान किशन (82) आणि हार्दिक पंड्या (87) यांनी दमदार खेळ साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला सलमान बट?
सलमान बट (Salman Butt) याने त्याच्या युट्यूब व्हिडिओत म्हटले, “मी आधी म्हणत होतो, की जेव्हा अशाप्रकारे जास्त दबावाच्या खेळाची (भारतीय संघात) गोष्ट येते, तेव्हा 2-3 खेळाडूंव्यतिरिक्त अनुभवाची कमतरता अशते. आज भारतासाठी चांगली बाब अशी राहिली की, त्यांचे मुख्य खेळाडू (रोहित शर्मा आणि विराट कोहली) लवकर बाद झाले आणि त्यांच्या युवा खेळाडूंनी संघाला सामन्यात पुनरागमन करण्यास मदत केली.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “आम्ही हे म्हणू शकत नाही की, पाकिस्तानने सहजरीत्या आव्हानाचा पाठलाग केला असता. हा एक रोमांचक शेवट झाला असता. भारताने चांगले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली असती, तर फाकिस्तानसाठी खूपच अडचण झाली असती. मी म्हणेल, की या सामन्यातून भारताला भरपूर फायदा झाला. प्रत्येकजण म्हणत होता, की जर रोहित आणि विराट या आक्रमणाविरुद्ध लवकर बाद झाले, तर काय होईल. झाले असे, की त्यांनी तरीही जवळपास 270 धावा केल्या.”
भारताचा डाव
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगल्या लयीत आणि संतुलित दिसला. मात्र, पावसामुळे जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला, तेव्हा तो बाद झाला. रोहितपाठोपाठ विराट कोहली (4), शुबमन गिल (10) आणि श्रेयस अय्यर (14) हेदेखील तंबूत परतले. यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी डाव सांभाळला. तसेच, संघाला समाधानकारक धावसंख्या मिळवून दिली. ईशान आणि हार्दिक यांनी पाचव्या विकेटसाठी भारतासाठी 138 धावांची भागीदारी रचली. त्यांच्या भागीदारीमुळे भारताने 48.5 षटकात 10 विकेट्स गमावत 266 धावा केल्या. (ind vs pak rohit sharma and virat kohli being dismissed early was the best thing that happened to india says this cricketer)
हेही वाचा-
इरफानने उडवली पाकिस्तानची खिल्ली, PAK चाहत्यांना येईल राग, तर भारतीय क्रिकेटप्रेमी होतील खुश; लगेच वाचा
‘मैत्री बाहेर ठेवायची…’, IND-PAK खेळाडूंना चेष्टा-मस्करी करताना पाहून भडकला गंभीर, वाचाच