अहमदाबाद। नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) बुधवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. तसेच हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरला आहे. त्याचा हा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. त्यामुळे ३२ वर्षीय इशांतने या सामन्यादरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
इशांतने मे २००७ सालामध्ये बांगलादेश विरुद्ध ढाका येथे कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचा एक प्रमुख भाग राहिला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या भारतीय संघातील तो सर्वात अनुभवी क्रिकेटपटू आहे. गेल्या १४ वर्षात त्याने १०० कसोटीत ३०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळताना केलेल्या विक्रमांकावर आण काही खास आकडेवारीवर एक नजर टाकू-
१. भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू –
२०० – सचिन तेंडुलकर
१६३ – राहुल द्रविड
१३४ – व्हीव्हीएस लक्ष्मण
१३२ – अनिल कुंबळे
१३१ – कपिल देव
१२५ – सुनील गावसकर
११६ – दिलीप वेंगसरकर
११३ – सौरव गांगुली
१०३ – विरेंद्र सेहवाग
१०३ – हरभजन सिंग
१०० – इशांत शर्मा
२. कमी वयात १०० कसोटी सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू –
२९ वर्षे १३४ दिवस – सचिन तेंडुलकर
३० वर्षे ३१३ दिवस – कपिल देव
३२ वर्षे १७५ दिवस – इशांत शर्मा
३२ वर्षे २३२ दिवस – दिलीप वेंगसरकर
३. इशांत शर्माची प्रत्येक २५ सामन्यानंतरची कामगिरी –
१ ते २५ सामने – ३७.३१ सरासरी, ७० विकेट्स
२६ ते ५० सामने – ३९.५८ सरासरी, ७१ विकेट्स
५१ ते ७५ सामने – ३३.१३ सरासरी, ७४ विकेट्स
७६ ते ९९ सामने – २१.३३ सरासरी, ८७ विकेट्स
४. कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळणारे पण वनडे विश्वचषक खेळण्याची संधी न मिळालेले क्रिकेटपटू –
ऍलिस्टर कूक (१६१ कसोटी)
व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ कसोटी)
कॉलिन कॉड्रे (११४ कसोटी)
जस्टीन लँगर (१०५ कसोटी)
इशांत शर्मा (१०० कसोटी)
५. इशांत शर्माने कसोटी पदार्पण करण्यापासून त्याच्यापेक्षा केवळ २ वेगवान गोलंदाजांनी अधिक काळ गोलंदाजी केली आहे. ते दोन गोलंदाज म्हणजे स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.
६. १०० व्या कसोटी सामन्यातील पहिला चेंडू टाकणारे गोलंदाज –
कपिल देव – भारत विरुद्ध पाकिस्तान, कराची, १९८९
इशांत शर्मा – भारत विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, २०२१
महत्त्वाच्या बातम्या –
शंभर कसोटी खेळणारा इशांत ११ वा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य १० क्रिकेटर