भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला दिग्गज खेळाडूंना पछाडत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असणार आहे.(india vs south africa)
ईशांत शर्मा( Ishant Sharma) हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. परंतु त्याला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कमागिरी करण्यात अपयश आले आहे. परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. जर तो या दौऱ्यावर चांगल्या फॉर्ममध्ये असला तर तो माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांच्यानंतर सर्वोत्तम भारतीय वेगवान गोलंदाज बनू शकतो.
माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (kapil dev) यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ गडी बाद केले आहेत. ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत.
तर झहीर खान (zaheer khan) आणि ईशांत शर्मा ३११ गडी बाद करत संयुक्तरित्या सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. (Highest wicket taker in test)
झहीर खानला टाकणार मागे
इशांत शर्माला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एक गडी बाद करण्यात यश आले तर तो मोठ्या विक्रमात झहीर खानला मागे टाकणार आहे. तो एक गडी बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहचणार आहे.
तसेच त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १०५ कसोटी सामन्यात ३२.४ च्या सरासरीने ३११ गडी बाद केले आहेत. त्याने १० वेळेस ४ तर ११ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. तसेच ७४ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्वाच्या बातम्या :
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पाहा वेळापत्रक
हे नक्की पाहा:






