---Advertisement---

हा मोठा पराक्रम करण्यापासून इशांत शर्मा केवळ एक विकेट दूर

On: शुक्रवार, ऑगस्ट 30, 2019 4:37 PM
---Advertisement---

आजपासून (30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला खास पराक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात जर इशांतने 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल.

सध्या तो आशिया बाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासह विभागून अव्वल क्रमांकावर आहे. इशांत आणि कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर कसोटीत प्रत्येकी 155 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर 45 कसोटी सामने खेळताना 155 विकेट्स घेतल्या आहेत. तर इशांतनेही आत्तापर्यंत 45 कसोटी सामने आशिया खंडाबाहेर खेळले असून त्यानेही 155 विकेट्स घेतल्या आहेत.

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. त्याने 200 विकेट्स आशिया खंडाबाहेर घेतल्या आहेत. आशियाबाहेर 200 विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ कपिल देव आणि इशांत आहेत.

#आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज –

155 – कपिल देव (45 सामने)

155 – इशांत शर्मा (45 सामने)

147 – झहिर खान (38 सामने)

117 – जवागल श्रीनाथ (31 सामने)

98 – मोहम्मद शमी (27 सामने)

#आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

200 – अनिल कुंबळे (50 सामने)

155 – कपिल देव (45 सामने)

155 – इशांत शर्मा (45 सामने) 

147 – झहिर खान (38 सामने)

123 – बिशनसिंग बेदी (34 सामने)

117 – हरभजन सिंग (32 सामने)

117 – जवागल श्रीनाथ (31 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने शब्द पाळला, विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट

अर्जून पुरस्कार मिळाल्यानंतर रविंद्र जडेजाने दिली ही प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

..म्हणून एमएस धोनीची झाली नाही भारताच्या टी२० संघात निवड, एमएसके प्रसादने केला खूलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment