भारतीय क्रिकेट संघाबाबत सातत्याने वर्कलोड मॅनेजमेंट या गोष्टीची चर्चा होत असते. प्रमुख खेळाडू तंदुरुस्त रहावेत म्हणून त्यांना विश्रांती दिली जाते. इतकेच नव्हे तर संघाच्या सपोर्ट स्टाफ व प्रशिक्षकांना देखील विश्रांती देण्यात येते. मात्र भारतीय क्रिकेटमध्ये सुरू झालेल्या या नव्या परंपरेवर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने टीका केली आहे.
ईशांत शर्मा मागील वर्षभरापासून भारतीय संघाबाहेर आहे. झहीर खान याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे. आपल्या याच मोठ्या कारकीर्द दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंट अशी कोणतीही संज्ञा नसल्याचे त्याने म्हटले. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला,
“मी केवळ एकच सल्ला देईल की वर्कलोडबाबत जास्त विचार करायला नाही पाहिजे. खरंतर ही कल्पनाच अगदी नवीन आहे. मी ज्यावेळी संघात सातत्याने खेळत होतो तेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतले जात नव्हते.”
ईशांत पुढे बोलताना म्हणाला,
“ज्यावेळी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आमचे प्रशिक्षक दुपारी एक वाजता चेंडू हातात द्यायचे. त्यानंतर आम्ही सूर्यास्तापर्यंत गोलंदाजी करत राहायचो. त्यामुळेच मला मोठे मोठे स्पेल टाकण्याची सवय झाली. पुढे रणजी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मी ही अशीच गोलंदाजी केली. तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि दुखापतींपासून दूर राहायचे असेल तर सातत्याने गोलंदाजी करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.”
ईशांत हा मागील वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघाचा भाग नाही. ईशांत सध्या दिल्लीसाठी रणजी ट्रॉफी खेळताना दिसतो.
(Ishant Sharma Talk On Workload Management Process In Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी