---Advertisement---

जसप्रीत बुमराह नाही, तर भारताचा ‘हा’ खेळाडू वाढविणार न्यूझीलंडचे टेन्शन…

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 7:54 PM
---Advertisement---

21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (2 Matches of Test Series) सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आपल्या संघाला सावध करत म्हणाला की, यजमान न्यूझीलंड संघाला केवळ भारताच्या जसप्रीत बुमराहवरच (Jasprit Bumrah) नाही तर इतर गोलंदाजांवरही लक्ष द्यावे लागेल.

परंतु बुमराहने मर्यादित षटकांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केली नव्हती. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत बुमराहने एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत त्याची घसरण झाली होती.

यादरम्यान भारतीय संघाला वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या (Ishant Sharma) पुनरागमनामुळे ताकद मिळेल. इशांतला रणजी ट्रॉफी दरम्यान पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. परंतु आता इशांतला मागील आठवड्यात कसोटी सामन्यासाठी फीट घोषित करण्यात आले आहे. तसेच तो नुकताच वेलिंग्टनमध्ये भारतीय संघाशी जोडला गेला आहे.

बुधवारी (19 फेब्रुवारी) पत्रकारांशी चर्चा करताना टेलर म्हणाला की, “मला वाटते की, जर आपण केवळ बुमराहकडे लक्ष केंद्रित केले तर समस्या निर्माण होईल. मला वाटते की, भारतीय संघाची गोलंदाजांची फळी चांगली आहे. यावेळी भारतीय संघात इशांतचे पुनरागमन झाले आहे. ज्याचा संघाला भरपूर फायदा होऊ शकतो.”

“भारतीय संघाकडे जागतिक दर्जाचे फलंदाजदेखील आहेत. आम्हाला त्यांचाही सामना करावा लागेल. यशस्वी होण्यासाठी आम्हाला आमचा चांगला खेळ खेळावा लागेल,” असेही टेलर यावेळी म्हणाला.

टेलर सर्व क्रिकेट प्रकारात 100 सामने खेळणारा फलंदाज होण्यापासून केवळ एक सामना दूर आहे. त्याचबरोबर तो 3 आठवड्यानंतर आपला 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आतापर्यंत त्याने 231 वनडे आणि 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---