---Advertisement---

आयएसएल: मुंबई सिटी एफसीच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम; दुबळ्या एफसी गोवाला लोळवण्यास सज्ज

On: शुक्रवार, फेब्रुवारी 25, 2022 6:40 PM
Mumbai-City-FC
---Advertisement---

गोवा| मुंबई सिटी एफसी यांनी मागील चारपैकी तीन सामने जिंकून पुन्हा स्वतःला इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल ) उपांत्य फेरीच्या शर्यतीत आणले आहे. शनिवारी त्यांना दुबळ्या एफसी गोवा संघाचा सामना करायचा आहे. गोवा संघ शर्यतीतून बाद झाला आहे आणि मुंबई सिटीचे पारडे जड आहे. मुंबई सिटीने मागील सामन्यात एफसी गोवा संघावर दणदणीत विजय मिळवला होता आणि परतीच्या लढतीतही असाच निकाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई सिटीने १७ सामन्यांत २८ गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे आणि गोवाविरुद्धचा विजय त्यांना एटीके मोहन बागानच्या ( ३१) गुणांशी बरोबरी करून देणारा ठरेल. अशात केरला ब्लास्टर्स विरुद्ध चेन्नईयन एफसी यांच्यात होणाऱ्या लढतीवर गणित अवलंबून असेल. केरला ब्लास्टर्सचे १७ सामन्यांत २७ गुण आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी मुंबई विरुद्ध केरला असा थेट सामना आहे. डेस बकिंग्हॅमचा मुंबई सिटी संघ गोवाविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान आणखी मजबूत करण्याचा निर्धार आहे. मागील पाच सामन्यांत मुंबईला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही.

”आमचे आणखी तीन सामने शिल्लक आहेत, परंतु एकावेळी एक सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे ध्येय आहे. या संपूर्ण हंगामात खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील काही आठवड्यांतील खेळ अधिक चांगला झालेला आहे आणि त्यात सातत्य राखण्याची काळजी प्रत्येकाला घ्यायची आहे. ठरवल्याप्रमाणे हंगामाचा शेवट आम्हाला करायचा आहे,” असे बकिंग्हॅम म्हणाले.

मध्यरक्षक लिंचपीन अहमद जाहौह दुखापतग्रस्त होता आणि तो उद्याच्या लढतीत खेळेल का, याबाबत विचारले असता बकिंग्हॅम म्हणाले,”तो गोवाविरुद्ध खेळणार आहे. दीर्घकालीन विचार करून आम्ही त्याला उद्याच्या लढतीत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे तीन सामने शिल्लक आहेत आणि एफसी चॅम्पियन्स लीगही येतेय. त्यामुळे वैद्यकिय टीमशी बोलून त्याच्याबाबतचा निर्णय घेऊ.”

एफसी गोवा संघाकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. १८ गुणांसह ते नवव्या स्थानावर आहेत. मागील सामन्यात हैदराबाद एफसीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि मुख्य प्रशिक्षक डेरीक पेरेरा यांनी हंगामाचा शेवट गोड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ”समोर कोणतंच ध्येय साध्य करण्यासारखे नसताना खेळणे अवघड आहे, परंतु आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी ही क्लबसाठी महत्त्वाची आहे. आम्हाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. खेळाडूही स्वतःला प्रेरणा देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत,”असे सहाय्यक प्रशिक्षक क्लिफोर्ड मिरांडा यांनी सांगितले.

जॉर्ज ऑर्टिज याचा अपवाद वगळता गोवा संघाकडून प्रभावी कामगिरी करणारं नाव सापडणार नाही. ऑर्टिजने १४ सामन्यांत ८ गोल केले आहेत आणि ५ गोलसाठी त्याचं सहाय्य आहे. आयएसएलच्या ८ पर्वांत दुसऱ्यांदा गोवा एफसीला अव्वल चारमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पदार्पणात त्रिशतक ठोकणाऱ्या बिहारच्या पठ्ठ्याचा आणखी एक धमाका; फक्त चौकारांच्याच मदतीने ठोकल्या ‘इतक्या’ धावा

जमशेदपूरला वेध सेमीफायनलचे; नॉर्थ ईस्ट युनायटेडशी भिडणार शुक्रवारी

भारीच ना! हैदराबाद एफसीचा उपांत्य फेरीत प्रवेश, केरला ब्लास्टर्सवर मिळवला दमदार विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---