पुणे । टिएटो आणि टिसीएस संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रि केट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत टिएटो संघाने सीबीएसएल संघावर तीन गडी राखून मात केली. टिएटो संघाने प्रथम फलंदाजी करणा-या सीबीएसएल संघाला १७.२ षटकांत ७८ धावांत रोखले.
यानंतर टिएटो संघाने विजयी लक्ष्य १६ षटकांत ७ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. दुस-या लढतीत टीसीएस संघाने अॅटॉस संघावर ३५ धावांनी मात केली. यात टीसीएस संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १६१ धावा केल्या.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अॅटॉस संघाला ९ बाद १२६ धावाच करता आल्या. यात सुनील बाबरने तीन, तर राहुल गर्गने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – १) सीबीएसएल – १७.२ षटकांत सर्वबाद ७८ (अजय पाटील २२, तनिष जैस्वाल नाबाद २०, पुष्पेंद्र सिंग २-१५, जतिन मदन २-५, अंकित जैन २-१२, धनाजी काळके १-११, सुगम सांगोळे १-१४) पराभूत वि. टिएटो – १६ षटकांत ७ बाद ७९ (जतिन मदन २४, अंकित जैन नाबाद १२, सचिन शेलार ३-२१, मेहेंदर १-१३, अजय पाटील १-२१, निखिल जोशी १-१७).
२) टीसीएस – २० षटकांत ३ बाद १६१ (गौरव भालेराव ४६, राहुल गर्ग नाबाद ४१, विक्रमजीतसिंग ३८, आदित्य नाबाद २१, रितेश पुरुषोत्तमन १-११, हर्षद तिडके १-२६, विवेक अहुजा १-२२) वि. वि. अॅटॉस – २० षटकांत ९ बाद १२६ (हर्षद तिडके ३७, दीपक गोयल नाबाद २०, सुनील बाबर ३-२३, राहुल गर्ग २-२२, जगन्नाथ गिड्डीमे १-९).