---Advertisement---

वनडे-टी20 मध्ये कामगिरी उत्कृष्ट! तरीही ‘हा’ स्टार भारतीय कसोटी क्रिकेटपासून वंचित

On: मंगळवार, सप्टेंबर 10, 2024 9:22 PM
Team India
---Advertisement---

भारतीय संघ आगामी बांगलादेशसोबत घरच्या भूमीवर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही सामने चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगणार आहेत. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसणार आहे. पण स्टार खेळाडू युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) या कसोटी मालिकेत स्थान मिळाले आहे.

युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारतासाठी टी20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. चहलच्या नावावर अनेक रेकाॅर्ड्स आहेत, पण सध्या चहल भारतीय संघात परतण्याची वाट पाहत आहे. चहलने गेल्या वर्षभरात भारतीय संघाकडून एकही सामना खेळला नाही. 2016 मध्ये त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला अद्याप कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

चहलच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2016ला पदार्पण केले होते, तर टी20 मध्ये सुद्धा 2016ला पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 72 एकदिवसीय आणि 80 टी20 सामने खेळले आहेत. पण त्याने एकही कसोटी सामना खेळला नाही.

72 एकदिवसीय सामन्यात 72.23च्या सरासरीने गोलंदाजी करत 121 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वेत्कृष्ट गोलंदाजी 42 धावा देऊन 6 विकेट्स अशी राहिली आहे. 80 टी20 सामन्यात त्याने भारतासाठी 96 विकेट्स घेतल्या आहैत. दरम्यान त्याची सरासरी 25.09 राहिली आहे. टी20 मध्ये 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणे हे त्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन राहिले आहे.

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

महत्त्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषक 2026 साठी आतापर्यंत कोणकोणते संघ पात्र ठरलेत? पाहा यादी
टीम इंडियानं दुर्लक्षित केलेल्या चहलचा इंग्लंडमध्ये राडा, एकट्याने अर्ध्या संघाला पाठवलं पव्हेलियनला
“बांगलादेशविरूद्ध कोहली 110-115 धावा नाही तर…” माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---