---Advertisement---

“दुख सगळ्यांनाच आहे, पण आम्ही चॅम्पियन!” – रिजवानचा व्हिडिओ चर्चेत

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2025 8:15 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे होते. पण स्पर्धेमधून पहिल्यांदा बाहेर होणारा देश पाकिस्तान संघच आहे. न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पाकिस्तान संघाने सलग दोन सामने पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघासाठी सेमीफायनल सामन्याचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानी चाहते तसेच अनेक दिग्गज खेळाडू यांनी कर्णधार मोहम्मद रिजवान सोबत संपूर्ण संघावर टीकांचा भडीमार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता मोहम्मद रिजवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो आपल्या संपूर्ण संघाच सांत्वन करताना दिसत आहे.

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद रिजवान म्हणताना दिसत आहे की, मित्रांनो दुःख सगळ्यांनाच आहे. आपल्याला माहिती आहे, पण आता आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवू आणि अशा टाळ्या वाजवू की आपण चॅम्पियन आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण चॅम्पियन आहोत. रिजवानने खेळाडूंना समजावून सांगितले आणि रूम मधून खेळाडूंसोबत सपोर्ट स्टाफ पर्यंत सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या.

आयसीसी वनडे स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघ खूप जास्त वेळापासून खराब प्रदर्शन करताना दिसत आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला 180 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. पण त्याच्या नंतर वनडे फॉरमॅट मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान संघाने कधीही सेमीफायनल सामन्यात प्रवेश केला नाही.

2019 च्या वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान संघ पॉइंट्स टेबल मध्ये पाचव्या स्थानी होता. तसेच 2023 च्या वर्ल्डकप मध्ये सुद्धा पाकिस्तान संघ सेमीफायनल सामन्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत सुद्धा पाकिस्तान संघाने अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली आहे. त्यांनी त्यांचे स्पर्धेतील दोन्ही सामने हरले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या संघामधील खेळाडूंनी शतकी खेळी केली आहे. पण पाकिस्तान त्या दोन संघांमध्ये एक संघ आहे, ज्यातील खेळाडूंनी एकही शतक केले नाही.

हेही वाचा 

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द; ग्रुप बी मध्ये चुरस वाढली

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अपयशानंतर PCBचा मोठा निर्णय – पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाला दाखवला घरचा रस्ता!

विराटचा आदर्श सचिन, बाबरचा खेळ सुस्त – शोएब अख्तरचा जोरदार हल्लाबोल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---