---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 3:38 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (ICC World Test Championship) सध्या भारत ७१.७ सरासरी पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडची टीम ७० पॉईंट्स दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाची टीम ६९.२ इतक्या पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरी न्यूझीलंड यानंतर या स्पर्धेतील कोणतीही कसोटी मालिका खेळणार नसल्याने आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्याने न्यूझीलंड या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. याबाबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने प्रतिक्रिया दिली आहे.

या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी त्याचा संघ उत्साहित असल्याचे त्याने स्पोर्ट्स टूडेशी बोलताना म्हटले आहे. त्याचप्रमाणे ही सामना अत्यंत चूरशीची असेल आणि या स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचे महत्व देखील तितक्याच प्रमाणात वाढत असताना दिसतयं, असेही तो म्हणाला.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ टिम पेनच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता, परंतु हा दौरा ऑस्ट्रेलियाने स्थगित केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणं म्हणजे एक जोखीमच ठरणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक यांनी सांगितले. ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आणि अशा परिस्थितीत तो दौरा करणे म्हणजे एक प्रकारचं आव्हान स्वीकारण्यासारखं आहे.

न्यूझीलंडला झाला ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्याचा फायदा

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्याचा फायदा आता त्यांच्या शेजारी असलेल्या न्यूझीलंडला झाला आहे. कोरोनाच्या कारणामुळे ऑस्ट्रेलियाने दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ आयसीसी कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. त्यामुळे आता अगामी भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका आता अधिक महत्वपूर्ण ठरणार आहे. या मालिकेनंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कोणता संघ खेळणार हे निश्चित होईल.

अशी आहेत समीकरणे –

अंतिम सामन्याचे दुसरे तिकिट मिळवण्यासाठी सध्या भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात चूरस आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केल्याने आता त्यांनाही भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. या मालिकेच जर भारताने किमान २ सामने जिंकून विजय मिळवला तर भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

तसेच जर या मालिकेत इंग्लंडने किमान ३ सामने जिंकून विजय मिळवला तर इंग्लंडला अंतिम सामना गाठण्याची संधी आहे. तसेच जर भारत इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका १-० फरकाने जिंकला किंवा भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली किंवा भारत जर इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला तर ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

“गिल असा क्रिकेटपटू आहे ज्याची येणाऱ्या काळात भरपूर चर्चा होईल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

व्हिडिओ गेममुळे बुमराहच्या समोर खेळण्यासाठी आला आत्मविश्वास, युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा अजब खुलासा

पहिल्या कसोटीसाठी गंभीरने निवडला ११ जणांचा भारतीय संघ; पण हार्दिकसह या अनुभवी खेळाडूंना नाही दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---