भारत आणि बांगलादेश संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. बांगलादेशने शेवटच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला घरात घुसून नमवले होते. पण भारताविरूद्ध बांगलादेशची कामगिरी खूपच खराब राहिली. आता दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना (27 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर) दरम्यान कानपूरमध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी स्टार खेळाडू शाकिबला पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. तो दुसरा सामना खेळणार की नाही? याबाबत स्पष्टता नाही.
भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालही पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री पॅनलमध्ये उपस्थित होता. शाकिबच्या तब्येतीची माहिती देताना तो म्हणाला, “शाकिबने गोलंदाजी केली नाही याचा मला धक्काच बसला. इतर लोकांशी बोलत असताना मला कळले की त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे, ज्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय त्याच्या खांद्यामध्ये समस्या आहे.”
शाकिबच्या दुखापतीबद्दल आपली नाराजी व्यक्त करताना तमीम इक्बाल (Tamim Iqbal) म्हणाला की, “जर शकीबला इतक्या अडचणी येत असतील तर संघ व्यवस्थापनाने मालिकेपूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे होते. त्याच्या म्हणण्यानुसार, सामना खेळण्यापूर्वी शाकिबशी बोलले गेले नव्हते आणि बोर्ड आपल्या गोलंदाजांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे यावरून दिसून येते. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
बांगलादेश क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांपैकी एक हनान सरकार म्हणाले, “शाकिब हा आमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. जेव्हा तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो, तेव्हा संघाची जुळवाजुळव करणे सोपे होते. आम्ही पुढील सामन्यापूर्वी शकिबच्या निवडीचा विचार करत आहोत. पुढचा सामना सुरू होण्यासाठी अजून वेळ शिल्लक आहे.”
भारत-बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची (Shakib Al Hasan) कामगिरी खास राहिली नाही. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याला एकही विकेट मिळाली नाही, तर पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने 32 धावांची खेळी खेळली होती. दुसऱ्या डावातही त्याला विकेट मिळाली नाही. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने 25 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे बुमराहबद्दल मोठे वक्तव्य
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांची कसोटी कारकीर्द
“फक्त 34 कसोटी खेळून महान…”, रिषभ पंतची धोनीशी तुलना करताना दिनेश कार्तिकचं मोठं वक्तव्य