fbpx
Sunday, January 24, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वचषकात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघावर असा विश्वास पुर्वी कुणी दाखवला नसेल…

It is time for achieve something really special for new zealand says former skipper brendon mccullum

September 15, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने विश्वचषक उपविजेत्या न्यूझीलंड संघाचे कौतूक केले आहे. तसेच संघाचे नेतृत्त्व करत असलेल्या केन विल्यमसन व इतरांची प्रशंसाही केली आहे. त्याने एका पॉडकास्टमध्ये बोलताना आपल्या संघावर  कौतूकाचा वर्षाव केला आहे.

मॅक्क्युलम आपल्या या संघालाबद्दल बोलताना म्हणाला, “न्यूझीलंड संघ 2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणे ही एक मोठी गोष्ट होती. परंतू आता काहीतरी विशेष करुन दाखविण्याची वेळ आली आहे.”

आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या मॅक्क्युलम याने एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “मला माहिती आहे की गेल्या वर्षी न्यूझीलंड संघ विश्वविजेते बनण्याच्या अगदी जवळ आले होते. परंतू आता न्यूझीलंड संघ खरोखर काहीतरी खास करण्याच्या जवळ आला आहे. केन विल्यमसन आणि इतर काही वरिष्ठ खेळाडूंच्या नेतृत्वात ते नक्कीच काहीतरी चांगले करतील.”

गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अत्यंत रोमांचक अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

2021 मधील टी20 विश्वचषक आणि 2022 मधील वनडे विश्वचषक भारतात होईल. म्हणजेच पुढील तीन वर्षांत भारत दोन विश्वचषकांचे आयोजन करणार आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक 2022 ला होणार आहे.

2015 च्या विश्वचषकात मॅक्युलमने संघांचे नेतृत्व केले होते. त्यावेळी न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. याच माजी विश्वचषक उपविजेता कर्णधाराला सध्याच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. “मला वाटते की अशी वेळ आली आहे की आता न्यूझीलंडच्या खेळाडूंना आता काहीतरी खास करुन दाखवावेच लागेल. मला खात्री आहे की ते चांगली कामगिरी करतील. त्यांना फक्त न्यूझीलंडचेच नाही तर जागतिक क्रिकेटचेही चांगले ज्ञान आहे,” असे तो म्हणाला.

“केन विल्यमसन संघाचे नेतृत्त्व अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे.  आता त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे. पूर्वी आम्ही इतर देशांशी आमची तुलना करायचो. आमच्याकडे संसाधनं नसल्याचा तेव्हा विचार करायचो. आता परिस्थिती वेगळी आहे, ” असे सध्याचा कर्णधार केन विल्समसनबद्दल बोलताना तो म्हणाला.

मॅक्क्युलमने न्यूझीलंडकडून १०१ कसोटी, २६० वनडे व ७१ टी२० सामने खेळले आहेत. जगातील एक महान यष्टीरक्षकांपैकी एक म्हणून  त्याला ओळखले जाते.


Previous Post

फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११

Next Post

वयाची तिशी पुर्ण केलेला मुंबईकर लढतोय टीम इंडियाकडून एक सामना खेळण्यासाठी

Related Posts

Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले…

January 24, 2021
Next Post

वयाची तिशी पुर्ण केलेला मुंबईकर लढतोय टीम इंडियाकडून एक सामना खेळण्यासाठी

पंजाबी मुंडा शिखर धवन शिकवतोय लाजाळू अजिंक्य रहाणेला भांगडा, पहा व्हिडीओ...

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आंद्रे रसेलवर अवलंबून आहे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ; यंदाही दिनेश कार्तिकची परीक्षा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.