गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वात प्रचंड प्रसिद्धी मिळविली आहे, तसेच आपला दबदबा निर्माण केला आहे. क्रिकेट विश्वात, भारत एक चमकणारा तारा असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने या काळात उत्कृष्ट कामगिरी करत, एकप्रकारे प्रत्येक विरोधी संघाला पराभूत केले आहे.
सध्याच्या भारतीय संघात एकापेक्षा एक उत्तम खेळाडू आहेत. त्याचबरोबर असे काही खेळाडू आहेत, जे पुढील काही वर्षांत कारकिर्दीचा निरोप घेऊ शकतात. परंतु सध्याच्या काळात त्यांच्या कामगिरीमुळे संघाला मोठा फायदा होत आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत, जे येणाऱ्या काळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार आहेत.
विराट कोहली अँड कंपनीचा सध्याचा संघ किंवा या क्षणी खेळत असलेले खेळाडू आणि येत्या काही वर्षांत संघात स्थान मिळविण्याचा दावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर या लेखात आपण त्या भारतीय संघाविषयी जाणून घेणार आहोत, जो ५ वर्षांनंतर टी२० प्रकारात अंतिम ११ चा सहभाग असतील.
सलामीवीर फलंदाज
केएल राहुल (KL Rahul)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल येणाऱ्या काळात बरीच वर्षे संघात खेळताना दिसू शकतो. राहुलकडे अजूनही बराच वेळ आहे आणि ज्या प्रकारची प्रतिभा त्याच्यामध्ये आहे. तो पाच वर्षानंतरही भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून खेळताना दिसू शकतो.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)
भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर म्हणून बरेच दावेदार आहेत. सध्या रोहित शर्मा तिथे आहे, परंतू वाटत नाही की ५ वर्षानंतर तो टी२० संघाचा भाग असेल. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर यशस्वी जयस्वाल येत्या काही वर्षांत संघात स्थान मिळवून ५ वर्षानंतर भारताचा सलामीवीर होऊ शकतो.
मधली फळी
विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, त्यामुळे विराटच्या तंदुरुस्तीला तोड नाही. विराटला सध्याच्या काळातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हटले जाते. त्याने जरी ३१ वय पार केले असेल, परंतू त्याची तंदुरुस्ती पाहता असे वाटते की ५ वर्षानंतरही तो संघाकडून खेळू शकतो.
शुबमन गिल (Shubman Gill)
भारतीय संघाच्या मधल्या फळीत बरेच बदल होऊ शकतात. सध्या भारतीय संघातील प्रत्येक युवा खेळाडू स्वत: ला सिद्ध करण्यात गुंतले आहेत. यात पंजाबचा युवा फलंदाज शुबमन गिलदेखील एक आहे. शुबमनने ज्या प्रकारची क्षमता दाखविली आहे, त्यामुळे तो ५ वर्षांनंतर भारतीय संघाचा भाग होण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडूंबद्दल बोलताना, मध्यक्रमात नेहमीच पुढे असणारा एक खेळाडू म्हणजेच श्रेयस अय्यर आहे. गेल्या जवळपास एका वर्षात अय्यर भारतीय संघात सातत्यपूर्ण स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे. त्याने दाखवून दिले आहे, की तो भारतासाठी खूप लांबचा पल्ला गाठू शकतो.
रिषभ पंत (Rishabh Pant)
भारतीय क्रिकेट संघाचा युवा प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा एक अत्यंत सक्षम खेळाडू आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने २ वर्षांपूर्वी संघात स्थान मिळवले. पंत जरी सध्या फॉर्ममध्ये नसला तरी येत्या काही वर्षांत तो भारताचा एक मोठा खेळाडू होऊ शकतो.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गेल्या काही वर्षांत स्वत: ला एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. पंड्याकडे अजूनही भारताकडून खेळण्यासाठी बराच वेळ आहे. आणि येत्या काही वर्षांत तो भारतासाठी एक मोठा स्टार खेळाडू असेल.
गोलंदाज
नवदीप सैनी (Navdeep Saini)
आयपीएलने गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक सर्वोत्तम असे युवा वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेट संघाला दिले आहेत. या युवा वेगवान गोलंदाजांपैकी एक नवदीप सैनी हा दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज आहे. सैनीने आपली प्रतिभा दाखवून भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता तो येत्या काही वर्षांत भारतासाठी सतत खेळताना दिसू शकतो.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
गेल्या काही वर्षात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संघाची गोलंदाजी फळीची कमान सांभाळली आहे. बुमराहने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, त्यामुळे त्याने केवळ भारतच नव्हे, तर क्रिकेट विश्वातही एक मोठा गोलंदाज म्हणून नाव कमावलं आहे. सध्या, बुमराहकडे क्रिकेट खेळण्यासाठी अजून बराच वेळ शिल्लक आहे. आणि येणाऱ्या काळातही तो संघासाठी अशीच जबाबदारी पार पाडेल, अशी अपेक्षा आहे.
दीपक चाहर (Deepak Chahar)
भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक युवा वेगवान गोलंदाज मिळत आहेत. यातच राजस्थानचा युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज दीपक चाहरने आपली क्षमता दाखविण्यात यश मिळविले आहे. चाहरने भारतीय संघाबरोबर खेळत चांगली सुरुवात केली असून तो पुढील काही वर्षांमध्ये संघाचा चांगला गोलंदाज होऊ शकतो.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav)
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कुलदीपने आपल्या चायनामन गोलंदाजीने गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे तो संघातील उपयुक्त खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे. कुलदीप येत्या काही वर्षांत संघासाठी फिरकी गोलंदाजीची भूमिका निभावत राहील.
वाचनीय लेख-
-टीममधून बाहेर काढले आहे, आता बॅटसुद्धा घ्या आणि मी जातो हात हलवत
-जेव्हा कोच व कर्णधार एकमेकांना भिडले, जाणून घ्या क्रिकेट इतिहासातील अशा ५ घटना
-रणजी ट्रॉफीतला ‘बॉस’ वसिम जाफरचे हे ५ विक्रम मोडणे केवळ अशक्य