वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज कर्णधार डॅरेन सॅमी याने त्यांच्या क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. सॅमीच्या मते वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड खेळाडूंनी इतर क्रिकेट बोर्डांच्या तुलनेत खूपच कमी वेतन देत आहे. याच कारणास्तव वेस्ट इंडीजचे खेळाडू विदेशातील टी-20 लीगमध्ये खेळताना दिसतात आणि बोर्ड देखील त्यांना आडवू शकत नाही. सॅमीने वेस्ट इंडीजच क्रिकेट बोर्डाच्या ढासळणाऱ्या स्तराविषयी महत्वाची मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडीज संघ सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात सुपर 12 फेरीमध्ये जागा बनवू शकला नाही. डॅरेल सॅमी (Daren Sammy) याच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजने यापूर्वी दोन आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. पण यावेळी मात्र वेस्ट इंडीज संघ खूपच खराब खेळताना दिसला. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलड, इंग्लंड अशा बलाढ्य संघाला वेस्ट इंडीज आधीपासून टक्कर देत आला आहे. पण यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात तसे होताना दिसले नाही.
वेस्ट इंडीजला दोन टी-20 विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार सध्या त्यांच्या क्रिकेट बोर्डावर नाराज आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. सॅम्सच्या मते याच कारणास्तव बीसीसीआय त्यांच्या खेळाडूंना विदेशातील टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही आणि खेळाडूंना देखील याच्याशी काहीच अडचण नाहीये. परंतु वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड असे करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे खेळाडूंना देण्यासाठी पुरेसा पैसा नाहीये. अशात खेळाडू या लीगमधून चांगला पैसा कमावत असताना बोर्ड त्यांना रोखू शकत नाही.
“भारतात अ श्रेणीच्या खेळाडूंना एका वर्षासाठी शक्यतो 10 लाख डॉलर्स मिळत असतील. पण वेस्ट इंडीजमध्ये अ श्रेणीच्या खेळाडूंना वर्षाला 1.50 लाख डॉलर्स मिळतात. दोन्ही बोर्डांकडून दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात खूप तफावत आहे आणि भविष्यात देखील हे अंतर असेच दिसणार आहे. खेलाडूंना दुसरीकडे चांगला मोबदला मिळत असेल, तेव्हा छोट्या बोर्डांसाठी खेळाडूंना त्यांच्यासोबत कायम ठेवणे अवघड असते. आता ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही क्रिकेटची आवड असल्यामुळे खेळत होता. ही आवड तुम्हाला सुपरमार्केटमध्ये भाजी-तरकारी विकत घेऊन देऊ शकत नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या यशामागे आहे हा अदृश हात! स्वतः केलाय खुलासा
आणखी काय करावं? धावांचा सह्याद्री उभारलेल्या ‘मुंबईकर’ सर्फराजसाठी टीम इंडियाची दारे बंदच