सध्या कोरोनाचा प्रभाव थोडाफार कमी होत चालला असून क्रीडाक्षेत्रात पुन्हा एकदा सामन्यांचा डंका वाजायला सुरुवात झाली आहे. मग ते कोणतेही क्रीडाक्षेत्र असो. सध्या फुटबॉलच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. फुटबॉलचा ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हटला जाणारा ‘युरो कप 2020’ ला सुरुवात झाली आहे.
इटलीची राजधानी रोममध्ये खेळला जाणारा उद्घाटन सामना यजमान इटलीने जिंकत स्पर्धेची उत्कृष्ट सुरुवात केली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी तुर्कीला 3-0 हरवले आहे. इटली संघाचे स्टार स्ट्राईकर सिरो इमोबिल आणि इन्सिग्ने यांनी 2 उत्कृष्ट गोल केले. तेच तुर्कीचा मेरिया देमीरोलने आत्मघाती गोल केला. सामन्याच्या अर्ध्या वेळेपर्यंत स्कोर 0-0 होता. परंतु सामन्याखेर 3-0 ने आघाडी घेत इटलीने रोममध्ये कोणत्याही स्पर्धा न हारण्याचा आपला रेकॉर्ड कायम ठेवला.
इटली संघाने युरो कपमध्ये आपल्या मागील 9 ऑलिम्पिक ग्रुप सामन्यात फक्त 1 सामना हरला आहे. तेच तुर्की संघाने आपले मागील 5 ऑलिम्पिक ग्रुप सामने हारले आहेत. पहिल्यांदा इटली संघाने युरो कपमध्ये 2 जास्त गोल केले आहेत. याच्याअगोदर 38 सामन्यांमध्ये त्यांना केवळ एका सामन्यात दोन पेक्षा जास्त गोल करण्यात यश आले होते. इटलीच्या नावावर या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त सामने अनिर्णित करण्याचा विक्रम आहे.
सामना बघायला स्टेडियमवर 16 हजार प्रेक्षक होते
मागील एक वर्षामध्ये जितकेही फुटबॉलचे सामने झाले आहेत, ते रिकाम्या स्टेडियममध्ये किंवा कमी प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहेत. मात्र शनिवारी इटली आणि तुर्कीमध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान स्टेडियमवर जवळजवळ 16 हजारपेक्षाही जास्त फुटबॉलप्रेमी सामना पाहण्यास आले होते. मागच्या वर्षी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. परंतु कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे हे सामने स्थगित करण्यात आले होते. त्यामुळेच यावर्षी हे सामने युरो कप 2020 च्या नावाने खेळवले जाणार आहेत. यावर्षी स्पर्धेत एकूण 51 सामने खेळले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 11 जुलैला लंडनमध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुनील छेत्रीने मेस्सीला टाकले मागे; ‘या’ यादीत रोनाल्डोपाठोपाठ मिळवला दुसरा क्रमांक
सुनील छेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मेस्सीला पछाडत ‘या’ विक्रमात ठरला दुसरा
विराटची फुटबॉल किक पाहून फुटबॉलपटूचा प्रश्न, ‘एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार?’