भारत आणि पाकिस्तान, हे क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिद्वंद्वी आहेत. या संघांमधील लढत पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेटजगत प्रतिक्षा करत आहे. आशिया चषक 2022 तर क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे. कारण आशिया चषकातील दुसराच साखळी फेरी सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झाला होता, जो अटीतटीचा राहिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुपर-4 फेरीतही हे संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत मजेशीर उत्तरे देत चांगले वातावरण बनवले.
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) सुपर-4 फेरीतील दुसरा सामना रविवारी (04 सप्टेंबर) दुबईत खेळणार आहे. हा सामना जिंकत उभय संघ अंतिम सामन्यातील त्यांचा दावा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतील. या सामन्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजी लाइन अपबद्दल प्रश्न विचारला असता, द्रविड यांनी गमतीशीर उत्तर दिले.
द्रविड हे नेहमी गंभीर आणि शांत असतात. परंतु भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर काहीवेळा द्रविड यांचा मजेशीर स्वभावही पाहायला मिळाला आहे. दुबईत कट्टर प्रतिस्पर्धींविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या गोलंदाजी लाइनअपबद्दलच्या प्रश्नावरही त्यांनी मजेशीर उत्तर दिले.
Jammy Sir trying to avoid using ‘Sexy’ for pak bowlers 🤣 #indvPakpic.twitter.com/lT2AAmnNuv
— mon (@4sacinom) September 3, 2022
ते म्हणाले की, “पाकिस्तानच्या गोलंदाजी लाइन अपसाठी मला एका शब्दाचा वापर करायचा होता. परंतु मी सर्वांसमोर तो शब्द वापरू शकत नाही.” असे म्हटल्यानंतर द्रविड यांना हसू अनावर झाले आणि ते पत्रकारांपुढे हसू लागले. ते म्हणाले की, “माझ्या डोक्यात एक शब्द आहे, तो माझ्या तोंडून निघणार होता, परंतु मी याचा वापर नाही करू शकत. जो शब्द मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामध्ये 4 अक्षरे आहेत. तो शब्द एस पासून सुरू होतो.”
थोडक्यात द्रविड यांना पाकिस्तानच्या गोलंदाजी लाइनअपसाठी ‘सेक्सी’ हा शब्द वापरायचा होता. परंतु त्यांनी तो म्हटला नाही. या गमतीशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारत डरपोक, शारजाहमध्ये खेळायला घाबरते’; महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानमधून इंडियावर आरोप
‘आम्ही पाकिस्तानची खूप धुलाई…’, कट्टर विरोधकांशी पुन्हा भिडण्यापूर्वी राहुल द्रविडने घेतली फिरकी
सूर्या आणि भारताच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यासाठी पाकिस्तानने आखली स्ट्रॅटेजी, वाचा सविस्तर