भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाने खेळपट्टीविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियान संघाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे याठिकाणी खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाटी अनुकूल होती आणि याच मुद्यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानेही खास प्रतिक्रिया दिली.
नागपूर कसोटीत फिरकी गोलंदाजांचा सामना करता यावा, यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने खास तयारी केली. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) प्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या रणजी खेळाडूलाही ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रात बोलवले गेले. पण या सर्वाचा संघाला प्रत्यक्षात काही फायदा होताना दिसला नाही. ऑस्ट्रेलियन संघा या सामन्यात पहिल्या डावात 177 तर दुसऱ्या डावात 91 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघ आणि त्यांचे माजी खेळाडू नागपूरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत असले, तरी डेल स्टेन मात्र सामन्यापूर्वी कधीच खेळपट्टी पाहत नव्हता. स्टेनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट शेअर केली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे.
डेल स्टेन (Dale Steyn) दक्षिण आफ्रिका संघाचा महान वेगवान गोलंदाज असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. स्टेनचे काही विक्रम अजूनही अबाधित आहेत. असा हा दिग्गज वेगवान गोलंदाज त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कधीच सामन्यापूर्वी खेळपट्टीचा विचार करत नव्हता. स्टेनने सांगितले की, सामना सुरू होण्याआधी खेळपट्टी पाहायाला त्याला आवडत नसायचे. गोलंदाजी किंवा फलंदाजीला गेल्यानंतरच तो खेळपट्टीकडे पाहत असायचा. त्याच्या मते गोलंदाजांनी खेळपट्टीपेक्षा स्वतःच्या लाईन आणि लेंथवर अधिक लक्ष दिले पाहिजे.
नागपूर कसोटी तिसऱ्या दिवशी निकाली निघाल्यानंतर स्टेनने सोशल मीडियावर लिहिले की, “तुम्हाला विश्वास बसणार नाही की, जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा कधीच सामन्याच्या आधी खेळपट्टी पाहायला मला आवडत नसायचे. जेव्हा गोलंदाजी करायची असेल किंवा फलंदाजी करावी लागेल, तेव्हाच मी खेळपट्टी पाहयचो. मी स्वतःच्या लेंथवर अधिक लक्ष देत असायचो.” दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असल्यामुळे भारतीय संघाच्या रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी एका डावात प्रत्येकी पाच-पाच विकेट्स घेतल्या. तसेच ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फी यानेही या सामन्यात 7 विकेट्सचा हॉल नावावर केला. ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात एक डाव आणि 132 धावांच्या अंतराने पराभूत झाला. (‘I’ve never done that…’, Dale Steyn’s advice to disgruntled Aussies on the pitch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया नव्हेतर ‘या’ संघाला WTC फायनलमध्ये जाण्याची सर्वात सोपी संधी, केवळ दोन सामने…
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच