न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेचा ११ वा सामना यजमान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. रविवारी (१३ मार्च) वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १४१ धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यादरम्यान न्यूझीलंडची फलंदाज मॅडी ग्रीन हिने ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिसा पेरी हिचा जबरदस्त झेल पकडला. हा अप्रतिम झेल घेऊन मॅडीने सर्वांनाच स्वतःचे कौतुक करण्यास भाग पाडले आहे.
ऑस्ट्रेलियाने सामन्यात प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीवेळी ४५ व्या षटकात मॅडी ग्रीन (Maddy Green) हिने हा सुंदर झेल घेतला. डावाच्या शेवटच्या काही षटकांमध्ये एलिस पेरी (ellyse perry) चांगल्या फॉर्ममध्ये आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नातही होती.
डावाच्या ४५ व्या षटकात ली तहुहु गोलंदाजी करत होती. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पेरीने लॉन्ग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला, पण त्याचवेळी मॅडी ग्रीनने अफलातून झेल घेतला. मॅडी ज्याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभी होती, तिथून ती डाव्या दिशेने धावली आणि एक सुंदर डाइव मारून एलिस पेरीला तंबूचा रस्ता दाखवला. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एलिस पेरीने सामन्यात ८६ चेंडूत ६८ धावा केल्या. पेरी ऑस्ट्रेलिसाठी सर्वाधिक धावा करणार खेळाडू ठरली आणि यासाठी तिला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. तिने केलेल्या धावांमध्ये ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. ज्यावेळी विकेट गमावली त्यावेळी पेरी आणि ताहलिया मॅकग्रा (५७) यांची शतकीय भागीदारी पूर्ण झाली. पण मॅडीने घेतलल्या झेलमुळे त्यांची भागीदारी तुटली. मॅडी ग्रीनने घेतलेला झेल पाहून मैदानातील सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि खेळपट्टीवरील विरोधी संघाच्या फलंदाजही हैराण झाल्या होत्या.
WHAT A CATCH! 🤯
Maddy Green with a contender for catch of the tournament! 🔥#CWC22
— ICC (@ICC) March 13, 2022
https://www.instagram.com/p/CbCbG5bhXiK/
एलिस पेरी झेलबाद झाल्यानंतर एशले गार्डनरने धावा करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. गार्डनरने १८ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिच्या या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ ३०.२ षटकात १२८ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाने १४१ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
आरसीबीला आतापर्यंत लाभलेत ६ कर्णधार, फाफ असेल सातवा; जाणून घ्या आतापर्यंतच्या कॅप्टन्सचे आकडे
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद सिराज
आयपीएल २०२२ मध्ये २ कर्णधार विदेशी, तर ८ संघांच्या नेतृत्वाची कमान भारतीय खेळाडूंकडे; पाहा यादी