---Advertisement---

ना सचिन; ना रोहित; ना अजिंक्य; अशी कामगिरी करणारा श्रेयस पहिलाच मुंबईकर

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 1:15 PM
---Advertisement---

आज (5 फेब्रुवारी) सेडन पार्क (Seddon Park), हॅमिल्टन (Hamilton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात द्विपक्षीय वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना (1st ODI Match) सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 348 धावांचे भले मोठे लक्ष ठेवले आहे.

या सामन्यात श्रेयस अय्यरने एक अनोखा विक्रम केला आहे. यावेळी भारताचा उत्कृष्ट फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 107 चेंडूत 103 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे. 32 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये चौथ्या क्रमांकावर शतकी खेळी करण्याचा विक्रम अय्यरने केला आहे.

त्यामुळे न्यूझीलंडमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळविणारा अय्यर दुसराच खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी असा कारनामा भारताचे माजी कर्णधार मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी 32 वर्षांपूर्वी 1988 मध्ये केला होता. त्यांनी 139 चेंडूत नाबाद 102 धावांची शतकी खेळी केली होती. यामध्ये 6 चौकारांचा समावेश होता.

अय्यरचे हे वनडे क्रिकेटमधील पहिलेच शतक असून त्याने ही कामगिरी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच वनडे सामन्यात केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज-

102* धावा – मोहिंदर अमरनाथ

103 धावा – श्रेयस अय्यर

https://twitter.com/Maha_Sports/status/1224698739169755136

https://twitter.com/Maha_Sports/status/1224662883537080320

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---