कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित आणि रद्द करण्यात आल्या आहेत. अशामध्ये जगभरातील खेळाडू मैदानापासून दूर आपल्या घरांमध्ये वेळ घालवत आहेत.
त्याचबरोबर पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेणारा दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज डेल स्टेनही (Dale Steyn) आपल्या घरी परतला आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) स्टेन खूप दु:खी आहे. यावेळी स्टेनने घरी परतल्यानंतर त्याच्याबरोबर घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे.
पाकिस्तान सुपर लीगदरम्यान (Pakistan Super League) हॉटेल अरेस्ट (Hotel Arrest) होण्याच्या घटनेबद्दल सांगताना स्टेन म्हणाला की, त्याला हॉटेलच्या रूममधून बाहेर निघण्याचीही परवानगी नव्हती.
“आम्ही अशा हॉटेलमध्ये कैद होतो जिथे आम्हाला बाहेर जाण्याची आणि रस्त्यावर फिरण्याची बंदी घालती होती. तो एक योग्य निर्णय होता. मला नियम तोडायला आवडत नाही. मला अशी चूक करून गुन्हेगार व्हायचे नव्हते, जेणेकरून मला पुन्हा पाकिस्तानमध्ये खेळण्याची संधीच मिळणार नाही,” असे स्टेन यावेळी म्हणाला.
कोरोना व्हायरसमुळे युरो विश्वचषक, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा, फ्रेंच ओपन टेनिस, फॉर्म्यूला वन शर्यत अशाप्रकारच्या अनेक मोठ्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. यावेळी स्टेन म्हणाला की मला अनेक गोष्टी घ्यायच्या होत्या. परंतु अशा परिस्थितीत हे सर्व करणे योग्य होणार नाही.
“मला असे वाटते की, सगळीकडे फक्त कोरोना व्हायरसची चर्चा होत आहे. कारण मी ज्या व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये आहे, त्यावर फक्त कोरोना व्हायरसची चर्चा होत आहे. तुम्ही या सर्वांपासून दूर जाऊ शकत नाही. साधारणपणे मी सुट्टीमध्ये फिरायला किंवा फिशिंग करण्यासाठी जातो. परंतु मी सध्या घरीच मजा करत आहे,” असेही यावेळी स्टेन म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहितसह हे ४ खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर बाद
-रणजी ट्राॅफीच्या फायनलमधील वाद शिगेला, बंगालच्या संघ या कारणाने वैतागला
-१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस