ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी२० टूर्नामेंट बिग बॅश लीगचा यंदा दहावा हंगाम चालू आहे. या हंगामातील ३५वा सामना रविवारी (१० जानेवारी) ब्रिसबेन हिट विरुद्ध सिडनी सिकर्स संघात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिसबेन हिटने १४८ धावा केल्या. या डावादरम्यान सिडनी सिकर्सचा गोलंदाज जॅक्सन बर्ड याने ब्रिसबेन हिटच्या एका फलंदाजांचा अजब ढंगात झेल पकडला. त्याच्या या झेलचा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
झाले असे की, ब्रिसबेन हिट संघाने प्रथम फलंदाजी करताना ९४ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज जिम्मी पर्सन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. तो कर्णधार ख्रिस लिनसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. अशात डावातील १५वे षटक टाकण्यासाठी सिडनी सिकर्सचा गोलंदाज जेक बॉल आला.
जेकच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जिम्मीने उंचा शॉट मारला आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या जॅक्सनच्या हातात गेला. मात्र घाई-घाईत त्याच्या हातून चेंडू निसटला. तरीही जॅक्सनने आपल्या दोन्ही पायांचा वापर करत मांडीमध्ये चेंडू घट्ट पकडला. समालोचकांसह सर्वांना वाटले की, चेंडू जमिनीवर टेकला असेल. परंतु जॅक्सनने हळूवार खाली बसत चेंडू जमिनीवर न पडू देता झेल पूर्ण केला. यामुळे जिम्मी १८ चेंडूत १६ धावा करत मैदानाबाहेर पडला.
Never in doubt, right @jbird431?!? 😎😎@BKTtires | #BBL10 pic.twitter.com/SCBAGhEuUm
— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2021
जॅक्सनच्या या गजब झेलचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिम्मी पर्सन बाद झाल्यानंतर केवळ लेविस ग्रेगरी दोन आकडी धावा करू शकला. त्याने १५ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार ठोकत २६ धावा केल्या. त्याच्यानंतर सिडनी सिकर्सच्या गोलंदाजांनी ब्रिसबेन हिटच्या एकाही फलंदाजांला दोन आकडी धावा करु दिल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू
ही तर हद्द झाली! भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेबद्दल ‘कर्णधार’ विराट संतापला
“टीम इंडिया दुसऱ्या डावात २०० धावा देखील करु शकणार नाही”, पहा कोणी केलंय हे वक्तव्य