गुरुवारी (१५ एप्रिल) बीसीसीआयने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली. यामध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना सर्वोच्च ए प्लस श्रेणीमध्ये सामील केले गेले आहे. मात्र त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार व सध्या समालोचक म्हणून काम करणारा मायकल वॉन नव्या कराराविषयी नाखूष दिसला. त्याने ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘या’ कारणाने नाराज आहे वॉन
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन क्रिकेट जगतातील होणाऱ्या प्रत्येक घडामोडीविषयी ट्विटरवरुन आपले मत मांडत असतो. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या भारतीय खेळाडूंच्या वार्षिक करारावर देखील त्याने टिप्पणी केली. त्याने ट्विट करत म्हटले, ‘रवींद्र जडेजा विराट कोहलीनंतर सर्वात महत्वपूर्ण खेळाडू आहे. हा एकप्रकारे अपमान वाटतो.’
बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या करारामध्ये विराट, रोहित व बुमराहसह जडेजाला ए प्लस श्रेणीमध्ये स्थान मिळायला हवे होते अशी, वॉन यांची इच्छा होती. जडेजा मागील जवळपास दोन वर्षापासून भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरी त्याने अनेक सामन्यात भारतीय संघासाठी निर्णायक भूमिका बजावलेली दिसते.
https://twitter.com/MichaelVaughan/status/1383076967151468544?s=20
https://twitter.com/MichaelVaughan/status/1383072055889956867?s=20
खेळाडूंना मिळते इतके वेतन
बीसीसीआय करारानुसार ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वर्षाकाठी ७ कोटी रुपये, तर ए श्रेणीच्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ३ कोटी आणि १ कोटी रुपये दिले जातात.
भारतीय खेळाडूंची वार्षिक करार यादी
ए प्लस श्रेणी– विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह
ए श्रेणी– रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत व हार्दिक पंड्या
ब श्रेणी– ऋद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर व मयंक अगरवाल
क श्रेणी– कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल व मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
‘यॉर्कर किंग’ नटराजनला का मिळाली नाही बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत जागा? जाणून घ्या कारण
धोनी म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या ‘काळजाचा ठोका’; प्रशिक्षकाने केलं तोंडभरुन कौतुक