विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहेत. भारताला अंगामी मालिका इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून खेळायची आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा हा युवा गोलंदाज शार्दुल ठाकूर याला ट्रोल करताना दिसून आला.
जडेजाने केले शार्दुलला ट्रोल
भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा हा आपल्या मजेदार स्वभावासाठी ओळखला जातो. तो सातत्याने आपल्या सहकार्यांची मजा घेत असतो. नुकताच त्याच्या निशाण्यावर युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आला. शार्दुल ठाकूर याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून एक छायाचित्र पोस्ट केले. या छायाचित्राला त्याने ‘सर्वकाही इंग्लंडमध्ये छान वेळ घालवताना’ अशा प्रकारचे कॅप्शन दिले.
https://www.instagram.com/p/CQ-1DmkjdkN/
शार्दुलच्या या इंस्टाग्राम पोस्टवर जडेजाने मजेदार कमेंट करताना लिहिले, ‘एकच स्वीटशर्ट आहे का तुझ्याकडे’. त्याच्या या उत्तरावर शार्दुल ठाकूरने अजिबात वेळ न दवडता लिहिले, ‘नाही दोन्ही छायाचित्रे एकाच दिवशी घेतली होती. बरं झाल, यापुढे मी तुला ट्रोल करेल.’
चाहत्यांनी दोघांच्या या संवादावर चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतीय संघासोबत आहे शार्दुल
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा शार्दुल ठाकूर सध्या भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याला अंतिम १५ जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, ४ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळायला मिळालेला दोन कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी करून भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार धोनीला ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंचे झाले पुनरागमन