क्रिकेटमध्ये टी20 लीग अनेक देशांनी सुरू केल्या आहेत. त्यामध्ये भारताची इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल (IPL) सर्वाधिक लोकप्रिय आहे. शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये आयपीएल 2023च्या लिलावाला उत्तम प्रतिसाद मिळत असताना त्याच दिवशी एका टी20 संघाने कोलंबोमध्ये इतिहास रचला. लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) जाफना किंग्ज या संघाने टी20 लीगमध्ये कोणलाही न जमलेला बलाढ्या विक्रम केला आहे.
एलपीएलची सुरूवात 2020मध्ये झाली. या लीगमध्ये एकाच संघाचे वर्चस्व दिसत आहे. जेव्हापासून ही लीग सुरू झाली तेव्हापासून एकच संघ जिंकला आहे. जो एक विक्रमच आहे. टी20 लीगचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत एका तरी संघाने दोन वेळा सलग विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली आहे, मात्र एकाही संघाला सलग तीनदा विजेतेपद जिंकता आलेले नाही. यामुळे जाफना किंग्जने विजेतेपदाची हॅट्ट्रीक करत नवा विक्रम केला आहे.
जाफना किंग्जने शुक्रवारी अंतिम सामन्यात कोलंबो स्टार्सचा 4 चेंडू आणि 2 विकेट्स शिल्लक राखत विजय मिळवला आहे. यामुळे सलग तिसऱ्यांदा जाफना किंग्ज एलपीएलचा विजेता ठरला. त्यांनी याआधी अशी कामगिरी 2020 आणि 2021मध्ये केली आहे.
जाफना विरुद्ध कोलंबो सामन्यात जाफनाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 163 धावा केल्या. त्यामध्ये सर्वाधिक धावा दिनेश चंडिमलने 49 आणि रवी बोपाराने 47 धावा केल्या. प्रत्युत्तरात जाफनाच्या सलामीवीरांनी उतत्म सुरूवात केली, रहनुल्लाह गुरबाझ 36 आणि अविष्का फर्नांडोने 50 धावा केल्या. त्यानंतर सदीरा समरविक्रमाने 44 धावा केल्या. त्यामुळे जाफनाने 8 विकेट्स गमावत 19.2 षटकात लक्ष्य पूर्ण केले.
Jaffna Kings are the Champions tonight for the 3rd consecutive time! ✨@maza_play @1xBatSporting @fairplay__news ⁰@officialskyexch ⁰#CBLMunchee⁰ #BJSports #nipponpaintlk ⁰@Toyamsportsltd ⁰@tigerexch @srilankavisit #Shaktea⁰ #AmericanPremiumWater @Dafanewsindia#LPL2022 pic.twitter.com/Wr8iFGLIH8
— LPL – Lanka Premier League (@LPLT20) December 23, 2022
सुरंगा लकमलने काही वेळेला जाफनाला अडचणीत आणले होते. त्याने 3 षटकात 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने शोएब मलिक, फर्नांडो आणि समरविक्रमा यांना बाद केले. या स्पर्धेत जाफनाचे नेतृत्व थिसारा परेरा करत होता.
या स्पर्धेतील पुरस्कार– समरविक्रमा मालिकावीर, कॅंडी फाल्कन्स संघाकडून खेळणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक विकेट्स घेतल्याने तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्याने 8 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या. जाफनाच्या अविष्का फर्नांडोने सर्वाधिक धावा केल्याने तो ग्रीन कॅप पटकावली. त्याने 10 सामन्यात 339 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के
नॉर्थ ईस्ट युनायटेड दुसऱ्या हाफमध्ये मुसंडी मारण्यास सज्ज, एटीके मोहन बागानशी सामना