---Advertisement---

मोठी बातमी! ACCच्या अध्यक्षपदी शहांची फेरनिवड, ICC अध्यक्षपदाबाबत संभ्रम

On: बुधवार, जानेवारी 31, 2024 1:47 PM
Jay Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाशी संबंधीत एक महत्वाची बातमी बुधवारी समोर येत आहे. जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार, असा चर्चा सुरू होत्या. पण अशातच बुधवारी (31 जानेवारी) एसीसीचे अध्यक्षपद पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

मंगळवारी (30 जानेवारी) आणि बुधवारी (31 जानेवारी) आशियाई क्रिकेट परिषदेची वार्षीक सर्वसाधारन सफा इंडोयनिशामध्ये पार पडली. या सभेत जय शहा एसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशा बातम्या मंगळवारी समोर आल्या होत्या. पण बुधवारी मात्र याच्या अगदी उळटे चित्र पहायाला मिळाले. शहा सगल तिसऱ्यांदा एसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. एका वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष श्रीमान शम्मी यांनी दुसऱ्यांदा शहा यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता. या नामांकनाला एसीसीच्या सर्व एकमताने पाठिंवा दिला. शहांसाठी एसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची ही तिसरी वेळ आहे. जानेवारी 2021 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पदभार स्वीकारला होता. आशियाई क्रिकेट परिषद सांभाळणारे शहा सर्वात तरून अध्यक्ष देखील ठरले होते.

दरम्यान, शहांची एसीसी अध्यक्षपदी तिसऱ्यांना निवड होण्याच्या एक दिवस आधी काही बातम्या आल्या होत्या. माध्यमांतील वृत्तांनुसार शहा आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहेत आणि ते या पदासाठी निवडणुकीत सहभाग देखील घेणार आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अशात शहा या पदासाठी दावा ठोकणार की नाही, हे येत्या काळात पाहण्यासारखे असेल. (Jai Shah became the president of ACC for the third time)

महत्वाच्या बातम्या – 
रोहित की विराट? माजी इंग्लिश दिग्गजाचा किंगला पाठिंबा; म्हणाला, ‘पहिल्या कसोटीत…’
धक्कादायक! मयंक अगरवालवर विषप्रयोग? स्टार फलंदाजाकडून पोलीसात तक्रार दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---