---Advertisement---

‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय

On: गुरूवार, जानेवारी 12, 2023 2:32 PM
Prithvi Shaw & Jay Shah
---Advertisement---

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23च्या हंगामामध्ये त्रिशतक झळकावत इतिहास रचला. त्याने मुंबईकडून खेळताना आसामविरुद्ध बुधवारी (11 जानेवारी) 383 चेंडूत 379 धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईचा पहिला डाव 4 बाद 687 असा झाला. पृथ्वी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या या ऐतिहासिक खेळीचे कौतुक करताना जय शाह यांनी ट्वीट केले. ज्याला पृथ्वीने दिलेला रिप्लाय चांगलाच व्हायरल होत आहे.

जय शाह (Jay Shah) हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव आहेत. त्यांनी पृथ्वीचे कौतुक करताना ट्वीटमध्ये लिहिले, ‘रणजी ट्रॉफीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केल्याबद्दल पृथ्वी शॉचे अभिनंदन. त्याच्यात खूप कौशल्य असून आम्हाला तुझा अभिमान आहे.’ या ट्वीटला पृथ्वीने उत्तर देत म्हटले, ‘धन्यवाद जय शाह सर. तुमचे शब्द महत्वाचे असून पुढेही अशीच मेहनत सुरू ठेवणार आहे.’

मागील काही महिन्यांपासून भारताचा संघनिवडताना पृथ्वीला दुर्लक्ष केले आहे. तसेच त्याला 2022चा बांगलादेश दौरा आणि घरच्या मैदानावर सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकतेही संधी दिली नाही. यामुळे त्याने निराश न होता स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडण्याचा क्रम सुरूच ठेवला आहे.

पृथ्वीने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारताकडून शेवटचा सामना जुलै 2021मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला नेहमीच संघ निवडताना वगळले गेले. त्याच्याकडे होणाऱ्या सततच्या दुर्लक्षामुळे चाहत्यांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे आणि आता तर त्याचे त्रिशतक पाहून त्यामध्ये आणखी भर पडत आहे.

रणजी ट्रॉफी 2022-23मध्ये मुंबई अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यानेही आसामविरुद्ध 191 धावा केल्या. त्याचबरोबर रहाणे आणि पृथ्वीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 401 धावांची भागीदारी झाली, जी 510 चेंडूमध्ये केली गेली. तसेच आसामचा पहिला डाव 8 बाद 346 असा झाला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिहान, रिवाने बाजी मारली; धीरूभाई अंबानी शाळेला टेनिसचे सांघिक विजेतेपद
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---