---Advertisement---

वयाची तिशी पार केलेल्या ‘या’ अष्टपैलूला करायचंय टीम इंडियात पुनरागमन, आकडेवारी राहिलीय कौतुकास्पद

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 7:04 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा रणसंग्राम येत्या ९ एप्रिल पासून रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव करत आहेत. आयपीएल स्पर्धेने युवा खेळाडूंसाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे, जिथे खेळाडूंना चांगली कामगिरी करून थेट आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळत असते. अशातच पंजाब किंग्ज संघाच्या जलज सक्सेसा या अष्टपैलूने आगामी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आयपीएल स्पर्धेत अनेक खेळाडू चांगली कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करत असतात. यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले जायचे. यात आता आयपीएल स्पर्धेची देखील भर पडली आहे.

यंदा पंजाब किंग्ज संघात जलज सक्सेना नावाचा खेळाडू सहभागी झाला आहे, ज्याने गेल्या १५ वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केरळ संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु त्याला संघात खेळायची संधी मिळाली नाही.

या ३४ वर्षीय खेळाडूला आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी आयपीएल खेळण्यासाठी खूप उत्साहित आहे. जर मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि पंजाब संघासाठी चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश करेल.

जलज सक्सेनाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १२३ सामन्यात ६००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ३४७ गडी देखील बाद केले आहेत. तसेच त्याने लिस्ट ए कारकिर्दीत एकूण ९९ सामने खेळले आहेत. यात त्याने फलंदाजी करताना १९६७ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ११६ गडीदेखील बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

लेडी बाहुबली! चक्क दोनदा अनुष्काने विराटला अलगद उचललं; भारतीय कर्णधाराच्या तोंडून निघालं, ‘ओए तेरी’

आयपीएलमध्ये पहिल्यांदा धोनी-रोहितवर लागली होती ‘इतक्या’ रुपयांची बोली, आज फ्रँचायझी कोटीत मोजतात पैसा

आयपीएल २०२१ लिलावात मिळाला नाही खरेदीदार, मग ‘या’ भारतीय शिलेदारांनी क्रिकेटला ठोकला रामराम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---