नॉटिंघम येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एक ऐतिहासिक कामगिरी केली. केएल राहुलला बाद करून तो जगातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. राहुल त्याचा कसोटी कारकिर्दीतील ६२० वा बळी ठरला.
अँडरसनच्या नावे जमा झाले ६२० बळी
आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील १६३ वा सामना खेळत असलेल्या ३९ वर्षीय अँडरसनने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची धुरा सांभाळलेल्या केएल राहुलला ८४ धावांवर यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेल द्यायला लावत कारकिर्दीतील ६२० वा बळी मिळविला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना सलग चेंडूंवर बाद करत त्याने भारताच्या अनिल कुंबळे यांची बरोबरी केली होती. कुंबळे यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ६१९ बळी मिळवले होते.
James Anderson, at 39, becomes the third-highest wicket-taker in Test cricket 🐐#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/vo874jWePa
— ICC (@ICC) August 6, 2021
अनेक विक्रम आहेत अँडरसनच्या नावे
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून अँडरसनकडे पाहिले जाते. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामन्यात खेळण्याचा विक्रम त्याच्या नावे जमा आहे. तसेच, आकडेवारीच्या बाबतीत तो कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी मिळवणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे.
या खेळाडूंच्या नावे आहेत सर्वाधिक बळी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने १३३ कसोटींमध्ये ८०० बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १४५ कसोटी सामने खेळताना ७०६ बळी मिळवले होते. यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५६३ बळी मिळविण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ट्रेंट ब्रिजमध्ये फिरली जडेजाची तलवार, अर्धशतकानंतर केले धमाकेदार सेलिब्रेशन
‘डीके ऑन टूर!’ कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर पडत दिनेशने लंडनमध्ये चालवली अनोखी स्कूटर; व्हिडिओ व्हायरल
‘किंग’ कोहलीने पत्नी अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर; वडिलांचीही काढली आठवण