---Advertisement---

टीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज

On: रविवार, ऑगस्ट 19, 2018 3:11 PM
---Advertisement---

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर 6 बाद 307 धावा केल्या आहेत.

या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची विकेट घेत भारताविरुद्ध खास विक्रम केला आहे. पंड्याची विकेट ही अँडरसनची भारताविरुद्धची कसोटी क्रिकेटमधील 100 वी विकेट ठरली.

भारताविरुद्ध कसोटीत 100 विकेट घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी असा विक्रम मुथय्या मुरलीधरनने केला आहे. त्याने भारताविरुद्ध कसोटीत 105 विकेट्स घेतल्या आहेत.

अँडरसनने हा पराक्रम भारताविरुद्धच्या 25 व्या कसोटी सामन्यात केला असुन त्याने हा 26.9 च्या सरासरीने या विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये दोन संघाविरुद्ध प्रत्येकी 100 विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने आॅस्ट्रेलिया आणि भारत अशा दोन संघाविरुद्ध 100 विकेट्स घेतल्या आहेत.

अँडरसन हा इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाराही गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत 141 कसोटी सामन्यात 26.87 च्या सरासरीने 554 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज-

105 विकेट्स – मुथय्या मुरलीधरन

100 विकेट्स – जेम्स अँडरसन

94 विकेट्स – इम्रान खान

76 विकेट्स – मालकॉम मार्शल

67 विकेट्स – सर अँडी रॉबर्ट्स

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…

रिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment