---Advertisement---

जिमीने गाठला जम्बो! विराटला बाद करताच अँडरसनने केली कुंबळेशी बरोबरी

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 2:51 AM
---Advertisement---

नॉटिंघम येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात रंगत आणली आहे. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव १८३ घावांवर गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने देखील भारताचे प्रमुख चार फलंदाज १२५ धावांमध्ये तंबूत पाठवले आहेत.

इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत असलेल्या जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा धारदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत दोन बळी मिळवले. या दोन बळींसह अँडरसनने एका खास यादीमध्ये भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याची बरोबरी केली आहे.

अँडरसनने मिळवले दोन बळी
नॉटिंघम कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीची चार षटके व दुसऱ्या दिवशीचा अँडरसनचा पहिला स्पेल त्याच्या लौकिकानुसार नव्हता. मात्र, लंचनंतर तो आपल्या जुन्या लयीमध्ये दिसून आला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला त्याने भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत इंग्लंडला जबरदस्त पुनरागमन करून दिले.

कुंबळेची केली बरोबरी
पुजारा व कोहली यांना बाद करताच अँडरसनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळींची नोंद झाली. भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यानेदेखील १३२ सामन्यात ही कामगिरी केली होती. ३९ वर्षीय अँडरसन सध्या १६३ वा सामना खेळत असून चालू डावात आणखी एक बळी मिळविल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुंबळेच्या ६१९ कसोटी बळींच्या विक्रमाला मागे टाकत तिसऱ्या स्थानी जाईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने १३३ कसोटींमध्ये ८०० बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १४५ कसोटी सामने खेळताना ७०६ बळी मिळवले होते. यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५६३ बळी मिळविण्याची कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय फलंदाजांना नेहमीच सतावतो अँडरसन, ‘या’ दिग्गजांना दाखवलाय सर्वाधिक वेळा तंबूचा मार्ग

एक ‘गोल्डन डक’ अन् कर्णधार म्हणून विराटच्या नावे नकोसा विक्रम

भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेस ‘या’ कारणामुळे आहे सीएसके संघाचा चाहता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---