---Advertisement---

ब्रॉडला संघात संधी न मिळण्याबद्दल अँडरसन म्हणाला, इंग्लंडसाठी चांगली गोष्ट झाली की…

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका बुधवारपासून(८ जूलै) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना साऊथँप्टन येथे सुरु आहे. मात्र या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ब्रॉडने संताप व्यक्त केला होता.

याबददल आता ब्रॉडचा संघसहकारी जेम्स अँडरसनने म्हटले आहे की यामुळे इंग्लंडची गोलंदाजी मजबूत असल्याचे दिसून येते.

अँडरसन शुक्रवारचा खेळ संपल्यानंतर म्हणाला, ‘ब्रॉड संघातून बाहेर गेल्याने निराश झाला आणि चिडला, पण यावरुन आमची गोलंदाजी फळी मजबून असल्याचे समजते. इंग्लंडसाठी ही गोष्ट चांगली आहे की संघातून बाहेर गेल्याने ब्रॉड निराश झाला.’

‘तो संघात खेळण्यासाठी आणि आमच्या यशाचा भाग होण्यासाठी आतुर आहे. त्यामुळे आमच्या संघाला पुढे जाण्यासाठी ही एक सकारात्मक गोष्ट आहे.’

याआधी ब्रॉडने संघातून वगळल्याबद्दल स्काय स्पोर्ट्सशी बोलताना राग व्यक्त करत म्हटले होते की ‘मी वैतागलो, चिडलोय. हे समजणे कठिण आहे. मला वाटते मी गेल्या काही वर्षांत मी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, त्यामुळे मला वाटते मला संधी मिळायला हवी होती. मी ऍशेससाठी संघात होतो आणि मी दक्षिण आफ्रिकेलाही गेला आणि जिंकलो.’

योबरोबरच इंग्लंडचे राष्ट्रीय निवडकर्ते एड स्मिथ यांच्याकडून भविष्याबद्दल त्याने स्पष्टीकरण मागितले होते. तो म्हणाला होता, ‘मी रात्री एड स्मिथशी बोललो, ते मला म्हणाले, १३ जणांचा संघ निवडण्यात त्यांचाही सहभाग होता आणि हा संघ पूर्णपणे खेळपट्टीला अनुरुप निवडण्यात आला आहे. मला माझ्या भविष्याबद्दल स्पष्टीकरण हवे आहे. मला माझ्या भविष्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.’

इंग्लंडच्या संघात पहिल्या कसोटीसाठी मार्क वूड, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन या वेगवान गोलंदाजांची निवड झाली आहे.

वाचनीय लेख –

पुतण्या, काका, मावसभाऊ, मेहुणा; पहा कसे आहेत क्रिकेटपटू एकमेकांचे नातेवाईक

वनडेमध्ये चौथ्या क्रमांक आपल्या धुवांदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय

भविष्यात हिटमॅन रोहित शर्माच्या जागेसाठी ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात दावेदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---