---Advertisement---

भारतीय फलंदाजांना नेहमीच सतावतो अँडरसन, ‘या’ दिग्गजांना दाखवलाय सर्वाधिक वेळा तंबूचा मार्ग

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 2:00 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. ट्रेंट ब्रिज मैदानावर होत असलेल्या या सामन्याचा गुरुवारी दुसरा दिवस आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी करत भारताला सकारात्मक सुरुवात दिली. मात्र, त्यानंतर अचानकपणे भारतीय संघाचा डाव घसरला. इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनने भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत भारतीय संघाला अडचणीत टाकले. अँडरसन नेहमीच भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसून आलेला आहे.

हे खेळाडू बनलेत सर्वाधिक वेळा अँडरसनची शिकार
नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनने दुसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये पुजारा व कोहली यांना बाद करत इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले‌. त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला ९ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये आपले शिकार बनवले आहे.

भारतीय फलंदाजांनांमध्ये अँडरसनने सर्वाधिक वेळा भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला बाद केले आहे. त्याने तब्बल १२ वेळा सचिनला तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा क्रमांक लागतो. धोनी अँडरसनच्या गोलंदाजीवर कसोटी क्रिकेटमध्ये १० वेळा बाद झाला होता. त्यानंतर आता विराट व माजी सलामीवीर गौतम गंभीर संयुक्तपणे तिसर्‍या स्थानी आहेत. अँडरसनने गंभीरला देखील नऊ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये बाद करण्याचा कारनामा केला होता.

विराट विरूद्ध अँडरसन सामना ठरतो रंगतदार
सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेला विराट व जगातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेला अँडरसन यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. २०१४ इंग्लंड दौऱ्यावर अँडरसनने विराटला चांगलेच सतावले होते. चार सामन्यांच्या आठ डावात विराट चार वेळा अँडरसनची शिकार झाला होता. मात्र, त्यानंतर २०१८ दौऱ्यावेळी अँडरसन विराटला एकदाही बाद करू शकला नव्हता. ३९ वर्षीय अँडरसन कदाचित भारताविरुद्ध कदाचित आपली अखेरची मालिका खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

एक ‘गोल्डन डक’ अन् कर्णधार म्हणून विराटच्या नावे नकोसा विक्रम

भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेस ‘या’ कारणामुळे आहे सीएसके संघाचा चाहता

Video: आवडत्या शॉटनेच केला रोहितचा घात, ‘असा’ झाला ३६ धावांवर बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---