ट्रेंट ब्रिज येथे भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारत मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने सर्वबाद 278 धावा करत 70 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 25 धावा केल्या होत्या. रॉरी बर्न्स 11 धावा तर डोमिनिक सीबली 9 धावांवर खेळत आहेत. दरम्यान भारताचा सलामीवीर केएल राहुल याला बाद करण्यासाठी इंग्लंड संघाला फार मेहनत घ्यावी लागली. मात्र मोक्याच्या क्षणी इंग्लंडला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने त्याची विकेट काढली.
भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणण्याचे श्रेय केएल राहुलला
भारताचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतरही राहुल खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 214 चेंडूंचा सामना करत 84 धावांची उपयुक्त खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 12 चौकार लगावले. मात्र दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलला शतक साजरे करता आले नाही.
राहुलच्या शतकाचा स्वप्नभंग केला तो इंग्लडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने. अँडरसनने राहुलला जोस बटलरच्या मदतीने झेलबाद करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. अँडरसनने असा काही चेंडू टाकला की, चेंडू सरळ राहुलच्या बॅटचा कडा घेत मागे यष्टीरक्षक बटलरच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला.
https://twitter.com/iamMAwais5/status/1423641569475932169?s=20
याआधी अँडरसनच्याच गोलंदाजीवर स्लिपमध्ये कर्णधार जो रुटने सोपा झेल सोडत राहुलला जीवनदान दिले होते. परंतु या जिवदानाचा फायदा राहुलला घेता आला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून मैदानावर तळ ठोकून असलेल्या राहुलला शतकाची आस होती. मात्र शतकाच्या नजीक पोहोचून बाद झाल्यामुळे तो थोडासा निराश झाल्याचे पाहायला मिळाले. मैदान सोडताना तो नकारार्थी मान हालवत आपण बाद झाल्याची निराशा व्यक्त करताना दिसला.
केएल राहुलची विकेट जेम्स अँडरसनसाठी ठरली विक्रमी
दुसरीकडे राहुलची विकेट घेत इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज अँडरसनने एक ऐतिहासिक कामगिरी केली. राहुलला बाद करून तो जगातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. राहुल त्याचा कसोटी कारकिर्दीतील 620 वा बळी ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने 133 कसोटींमध्ये 800 बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 145 कसोटी सामने खेळताना 706 बळी मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
नॉटिंघम स्टेडियममध्ये दिसला अगदी रिषभसारखा व्यक्ती; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर पंतचा जुळा भाऊ’
तब्बल १८ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणार न्यूझीलंड संघ, वेळापत्रकाची झाली घोषणा
‘आम्ही मान्य करतो की पंत सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे,’ विरोधी संघाच्या अव्वल गोलंदाजाकडून स्तुती