इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन भारताविरुद्ध आपल्या उत्तम कामगिरी चमक दाखविण्यास तयार आहे. अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या दरम्यान अँडरसनने ६०० विकेट पूर्ण केल्या आणि असे करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत विराट कोहली आणि जेम्स अँडरसन यांच्यातील झुंज पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीमध्ये सुद्धा आतुरता आहे.
सन २०१८ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामान्यांच्या मालिकेत भारताला ४-१ च्या पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु या मालिकेत विराट कोहलीने आपल्या फलंदाजीची चमक दाखवून अँडरसनला सतावून सोडले होते. त्याने एकदाही विकेट अँडरसनच्या ताब्यात दिली नसल्यामुळे आजही अँडरसन विराट कोहलीची विकेट घेण्यास तरसतो आहे.
साल २०१४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी विराटने बराच संघर्ष केला होता, या दौऱ्यात जेम्स अँडरसनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विराटला नकोसे केले होते. सलग चार वेळा विराट कोहली हा अँडरसनचा बळी ठरला होता. हा दौरा विराटच्या खराब कामगिरीसाठी नेहमीच चर्चिला जातो.
त्यानंतर सन २०१६ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी त्या मालिकेमध्ये विराटने आपली फलंदाजी इतकी सुधारली की इंग्लंडचे गोलंदाज त्याची विकेट घेण्यास तरसत होते, ज्यात अँडरसनचा देखील समावेश होता. २०१६ पासून कोहलीने अँडरसनच्या ३८२ चेंडूंचा सामना करत अवघ्या १८२ इतक्या धावा काढल्या. इतके खेळुन सुद्धा विराटने त्याला एकही विकेट न देता आपले वर्चस्व कायम राखले.
कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसन हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे ज्याने १५६ कसोटीत ६०० विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने त्याच्या कारकिर्दीत १९४ एकदिवसीय सामन्यात २७९ बळी आणि १९ टी-२० सामन्यात १८ बळी घेतल्या आहेत. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत अँडरसन आपल्या गोलंदाजीची योग्य चमक दाखवून विराटची बळी घेण्यास विजयी ठरेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वेलकम होम ‘बुम बुम’! इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच घरच्या मैदानावर बुमराह खेळणार कसोटी क्रिकेट
चेन्नई कसोटीपुर्वी सचिनचा इंग्लंडला मदतीचा हात, सांगितला भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा उपाय
INDvsENG Test Live : इंग्लंडने जिंकली नाणेफेक; ‘या’ खेळाडूंना मिळाली ११ जणांच्या संघात संधी