राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल २०२२ मध्ये धमाकेदार प्रदर्शन करताना दिसत आहे. यंदाच्या हंगामातील पहिले शतक राजस्थानच्या संघातूनच निघाले आहे. तसेच त्यांचे गोलंदाजही दमदार लयीत आहेत. राजस्थानने आतापर्यंत त्यांच्या ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. यादरम्यान राजस्थानचा अष्टपैलू जेम्स नीशम, याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या क्रिकेटमधील निवृत्तीबाबतची पोस्ट टाकली होती. परंतु हा त्याच्याद्वारे केला गेलेला विनोद होता.
खरे तर, नीशमने (James Neesham) राजस्थानचा धाकड फलंदाज रियान परागला (Riyan Parag) नेट्समध्ये गोलंदाजी करण्यातून निवृत्ती घेतली आहे. याचे कारण स्पष्ट करण्यासाठी त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे.
व्हिडिओत दिसते की, रियान नेट्समध्ये चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने त्याचा संघ सहकारी आणि मध्यमगती गोलंदाज नीशमच्या गोलंदाजीवर नेटमध्ये सराव केला. यादरम्यान रियानच्या स्ट्रेट शॉटवर नीशम जवळपास दुखापतग्रस्त होता होता वाचला. नीशमला त्याच्या चेंडूपासून वाचण्यासाठी जमिनीवर पडावे लागले. नीशमने याच संधीचा लाभ घेत चाहत्यांसोबत मस्ती करण्याचे ठरवले आणि निवृत्तीची घोषणा (James Neesham Announced Retirement) केली.
— Ayush (@ayush2052) April 9, 2022
नीशमला अद्याप राजस्थानकडून (Rajasthan Royals) त्याचे पदार्पण करता आले नाहीय. त्याला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकलेली नाही. दुसरीकडे रियान पराग आपल्या दमदार प्रदर्शनाने छाप सोडण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
जेम्स नीशमची आयपीएल कारकीर्द
नीशमने आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थानव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने आतापर्यंत १२ आयपीएल सामने खेळताना ६१ धावा आणि ८ विकेट्सची कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२२साठी असा आहे राजस्थान रॉयल्स संघ – संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण सेन , ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जिमी नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डॅरिल मिशेल
महत्त्वाच्या बातम्या-
भावंड दिवस: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या