---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर; भारताविरुद्ध २० विकेट्स घेणारा ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून बाहेर

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 7:52 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या ३ दिवसांभर येऊन ठेपली आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. पॅटिन्सन कुटुंबासोबत सुट्ट्या साजऱ्या करत असताना तिथेच त्याला ही दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने त्याचा बदली खेळाडू म्हणून इतर खेळाडूला संधी न देण्याची घोषणा केली आहे.

आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या २ कसोटी सामन्यात पॅटिन्सन प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या बदली खेळाडूला संघात सामील करण्यास नकार दिला आहे. असे असले तरी, चौथ्या कसोटी सामन्यापुर्वी त्याच्या दुखापतीची माहिती घेतली जाईल.

जेम्स पॅटिन्सनची कसोटी कारकिर्द

पॅटिन्सनच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याला आतापर्यंत जास्त संधी मिळाल्या नाहीत. डिसेंबर २०११ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने केवळ २१ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान २६.३३ च्या सरासरीने त्याने ८१ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान भारताविरुद्ध त्याने ५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तब्बल २० विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून सिडनी येथे होणारा कसोटी सामना ‘पिंक टेस्ट’ नावाने ओळखला जातो

‘या’ दोन पाकिस्तानी क्रिकेटर्सचे मजेदार संभाषण झाले स्टंप माईकमध्ये कैद, पहा व्हिडिओ

व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---