इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत इंग्लंड संघाला १८३ धावांवरच गारद केले. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीची सुरुवात चांगली केली. पहिल्या विकेटसाठी भारतीय संघाने ९७ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर भारतीय संघाने १५ धावांत ४ विकेट गमावल्या. त्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात आला. तेव्हा त्याने संथ फलंदाजी न करता पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकता दाखवली.
पंतच्या या फलंदाजी शैलीवर इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन याने प्रतिक्रिया दिली आहे. पंतच्या आक्रमक फलंदाजी शैलीची संघाला आधीच असल्याचे त्याने सांगितले आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाल्यावर अँडरसन म्हणाला, “आम्ही ज्या योजनेवर काम करत होतो, ती योजना यशस्वी झाली. आम्हाला माहीत होते पंत कशाप्रकारे खेळणार आहे. तो एक आक्रमक फलंदाज आहे त्याची खेळण्याची शैली एकदम निराळी आहे. तो कोणतेही शॉट सहजपणे मारण्यात सक्षम आहे. आपल्याला हे मान्य करायला हवे की तो एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची खेळण्याची शैली अत्यंत उत्कृष्ट आहे”.
या सामन्याच्या आधीही अँडरसनने पंतवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यात तो म्हणाला होता, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो, कारण मला वेगवेगळ्या पिढीतील खेळाडूंसोबत खेळायची संधी मिळाली. अशा खेळाडूंसोबत खेळणे मला एक वेगळाच अनुभव देऊन जाते. आपण पाहू शकतो की, आयपीएलमधील खेळाडू एकदम बिनधास्त खेळतात. कोणताही शॉट ते सहज खेळू शकतात. आता रिषभ पंतलाच पाहिले तर, आपणाला कळेल ज्याप्रकारे त्याने मागील दौऱ्यात नवीन चेंडूवरच माझ्याविरुद्ध रिव्हर्स स्वीप खेळला होता. असे तर आपण सौरव गांगुलीला देखील खेळताना पाहिले नसेल”
दरम्यान, ३९ वर्षाच्या या खेळाडूने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक गोलंदाजी करत पहिल्या डावात ५४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. भारताला तिसऱ्या दिवशी ९५ धावांची बढत मिळाली असून, इंग्लंडचा संघ २५ धावांवर फलंदाजी करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
–मोठ्या मनाचे कुंबळे! स्वत:चाच ‘तो’ विक्रम मोडल्यानंतरही केले अँडरसनचे कौतुक
–अर्धशतक पूर्ण करताच मोठा फटका मारण्याच्या नादात ‘असा’ बाद झाला रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ
–Video: पंतने सलग २ चेंडूत मारले चौकार-षटकार, पण त्यापुढच्याच चेंडूवर झाला ‘असा’ बाद