---Advertisement---

आशियाई चॅम्पियन जपान भारताकडून पराभूत, सलग दुसऱ्या विजयासह अंतिम चारमध्ये मिळवले स्थान

On: मंगळवार, डिसेंबर 13, 2022 12:45 PM
Indian Women's Hockey team
---Advertisement---

भारतीय महिला हॉकी संघ सध्या एफआईएच महिला नेशंस कप (FIH Women’s Nations Cup)) खेळत आहे. सोमवारी (12 डिसेंबर) भारत आणि जपान यांच्या महिला हॉकी संघांमध्ये आमना-सामना झाला. उभय संघातील हा सामना सोमवारी रात्री उशिरा स्पेनच्या वेलेंसियामध्ये पार पडला, जो भारताने 2-1 असा फरकाने नावावर केला. या विजयासह भारत या स्पर्थेत पूल बी मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच अंतिम चार संघांमध्येही भारताचे स्थान पक्के झाले आहे. 

याआधीच्या सामन्यात भारती महिला हॉकी संघाने (Indian Women’s Hockey Team) चिली संघाला 3-1 अशा अंतराने पराभूत केले होते. सोमवारी जपानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतासाठी सलीमा टेटे (Salima Tete) हिने चौथ्याच मिनिटात गोल केला. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. अशा प्रकारे सामन्याच्या हॉफटाईमपर्यंत भारत एका गोलने आघाडीवर होता.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये ब्यूटी डुंगडुंग (Beauty Dungdung) हिने अप्रतिम प्रदर्शन करत मैदानी गोल केला. तिच्या या गोलच्या जोरावर  भारत 2-0 असा आघाडीवर पोहोचला. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये मात्र जपानची ताकाशिमा रुई हिने भारतीय डिफेंसला भेदत सामन्यातील फरत 2-1 असा केला. सामना बरोबरीवर करण्यासाठी जपानला अजून एका गोलची आवश्यकता होती. मात्र त्यांच्या खेळाडू शेवटच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये एक गोल करू शकले नाहीत. परिणामी भारतीय संघाने सामना नावावर केला.

जपान या सामन्यात पराभवानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला आता 14 डिसेंबर रोजी पुढच्या फेरीत दक्षिण आफ्रिका संघासोबत सामना खेळायचा आहे. पूल ए मध्ये स्पेन संघ दोन सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर  आहे. तर आयर्लंड या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटली आणि कोरिया एक पराभव आणि एक ड्रॉ सह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. (Japan defeated by Indian women’s hockey team in FIH Women’s Nations Cup)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी 2018 मध्ये पदार्पण करणारा ‘हा’ गोलंदाज रुग्णालयात दाखल! जाणून घ्या कारकीर्द 
पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूची अखिलाडूवृत्ती! थेट स्टोक्सशी ‘हँडशेक’ करण्यास दिला नकार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---