वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (West Indies vs England ) या दोन्ही संघांमध्ये नुकताच ५ टी२० सामन्यांची मालिका संपन्न झाली. या मालिकेतील अंतिम सामना रविवारी (३० जानेवारी) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने १७ धावांनी जोरदार विजय मिळवला. यासह ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यात वेस्ट इंडिज संघातील अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर याने (Jason Holder) एक मोठा कारनामा करत इतिहासाला गवसणी घातली आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या अंतिम टी२० सामन्यात जेसन होल्डरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो वेस्ट इंडिज संघाकडून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच (First west indies bowler to take hattrick in T20I) गोलंदाज ठरला आहे. त्याने सलग ४ चेंडूंमध्ये इंग्लंडच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने ख्रिस जॉर्डनला ७ धावांवर, आदिल राशिदला ० आणि शाकिब महमूदला ० धावांवर माघारी धाडत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर सॅम बिलिंग्सला ४१ आणि कर्णधार मोईन अलीला १४ धावांवर माघारी धाडत त्याने आपले ५ गडी बाद केले.
अधिक वाचा :“हा निर्णय विराटच्या नेतृत्व कारकिर्दीतील मास्टरस्ट्रोक”
असा कारनामा करणारा ठरला चौथा गोलंदाज
या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ चेंडूत ४ गडी बाद करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अफगानिस्तान संघाचा फिरकीपटू राशिद खान, श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि आयर्लंड संघातील गोलंदाज कुर्टीस कांपरने असा कारनामा केला आहे. कुर्टीस कांपरने गतवर्षी झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत असा कारनामा केला होता.
Historic moment – Jason Holder becomes the first West Indies player to take a hat-trick in T20I and we are lucky to have @irbishi as the commentator for this great moment.pic.twitter.com/JtCfd69wEp
— Johns. (@CricCrazyJohns) January 31, 2022
https://twitter.com/sportsgeek090/status/1488009723572289536
Jason Holder picks up FOUR WICKETS in FOUR BALLS to end the England innings! 🤯#WIvENG pic.twitter.com/SrZDAbG3pr
— ICC (@ICC) January 30, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजी करताना कायरन पोलार्डने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर रोवेन पॉवेलने ३५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला २० षटक अखेर ४ बाद १७९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, इंग्लंड संघाकडून जेम्स विंसीने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर सॅम बिलिंग्सने ४१ धावांचे योगदान दिले. हा सामना इंग्लंड संघाने १७ धावांनी गमावला.
महत्वाच्या बातम्या :
गंभीर सोबतच्या ‘त्या’ वादाबाबत १२ वर्षांनी बोलला अकमल; म्हणाला…
मॅक्सवेल असणार विराटचा उत्तराधिकारी? ‘ही’ नावेदेखील चर्चेत
हे नक्की पाहा: काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये । World Cup Semi Final 2019