---Advertisement---

वेस्ट इंडिज क्रिकेटने घेतला मोठा निर्णय, निवड समीतीत होणार ‘हे’ फेरबदल

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 9:04 AM
---Advertisement---

सध्या भारताप्रमाणेच वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये देखील फेरबदलाचे वारे वाहत आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघाच्या निवड समीतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजने (Cricket West Indies) मुख्य निवडकर्ते रॉजर हार्पर (Roger Harper) आणि त्याच्या सोबत असणारा माइल्स बासकॉम्बे (Miles Bascombe) यांचा करार पुढे वाढणार नाही असं सांगितलं आहे. त्यांचा करार लवकरच संपणार आहे.

वेस्टइंडीज क्रिकेटने आपली निवड समिती बदलायचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशिक्षक फिल सिमन्स (Phil Simmons) अंतरिम समितीचे प्रमुख म्हणून काम करत सर्व प्रकारच्या कर्णधारांसोबत संघ निवडतील. नवीन निवडकर्त्यांची लवकरच निवड होणार आहे. रॉजर हार्पर आणि माइल्स बासकॉम्बे यांचा करार ३१ डिसेंबरला संपणार आहे.

क्रिकेट वेस्टइंडीजच्या या निर्णयानंतर हार्पर म्हणाले, “मी सीडब्ल्यूआयचे (CWI) आभार मानू इच्छितो की त्यांनी मला हे पद सांभाळण्याची जबाबदारी दिली. भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा बोर्ड आणि संघासोबत नेहमी असतील. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला या कार्यकाळात समर्थन आणि मदत केली.”

तसेच सीडब्ल्यूआयचे डायरेक्टर जिमी ऍडम्स (Jimmya Adams) म्हणाले, “आम्ही रॉजर आणि माइल्सचे मनापासून आभार मानतो. मागच्या २ वर्षात त्यांनी त्याची जबाबदारी नीट पार पाडली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी वेस्टइंडीजचा संघ निवडणं हे एक मोठं आव्हान असतं. आणि त्यांनी ते चोखपणे पार पाडलं.”

टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) निवडला गेलेल्या १५ सदस्यीय संघावरून बरेच प्रश्न उभे राहिले होते. त्या १५ खेळाडूंमध्ये माजी कर्णधार जेसन होल्डरचा (Jason Holder) समावेश नव्हता. त्याने आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये अष्टपैलू कामगिरी करूनही त्याला संघात घेण्यात नव्हतं आलं. तसेच संघात रवी रामपॉलने (Ravi Rampaul) बऱ्याच वर्षांनी पुनरागमन केलं. ‘युनिव्हर्स बॉस’ (Universe Boss) ख्रिस गेलला (Chris Gayle) घेतल्यावरून सुद्धा खूप चर्चा होत होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘पत्नी आणि गर्लफ्रेंड खूपच ताण देतात’, वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या त्या प्रश्नावर गांगुलीचे लक्षवेधी उत्तर

वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क

‘या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---