Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तीन बलाढ्य संघ सोडले, तर प्रत्येक संघ कमीच कसोटी खेळतोय…’, वेस्ट इंडीजच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

'तीन बलाढ्य संघ सोडले, तर प्रत्येक संघ कमीच कसोटी खेळतोय...', वेस्ट इंडीजच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

March 2, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या

वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डर याने कसोटी क्रिकेटविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. होल्डर कसोटी फॉरमॅटमध्ये 150 विकेट्स आणि 2500 धावा करणारा वेस्ट इंडीजचा केवळ दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी दिग्गज गॅरी सोबर्स (Garry Sobers) यांनी असी कामगिरी केली होती. सोबर्सने त्यांच्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले आहेत. होल्डरच्या मते तो कधीच सोबर्सचा हा विक्रम मोडू शकत नाही.

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सेंचुरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर जेसन होल्डर (Jason Holder) माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन बलाढ्य संघ सोडले, तर कोणताच संघ जास्त कसोटी क्रिकेट खेळत नाहीये, असे म्हटले. होल्डर म्हणाला, “जागतिक क्रिकेटमध्ये सध्या ज्या पद्धतीने सामने खेळले जात आहेत, बलाढ्य तीन देश सोडून प्रत्येक संघ कसोटी क्रिकेट कमीच खेळत आहे. आम्ही मागच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये सरासरी सहा ते आठ कसोटी खेळल्या आहेत. यावर्षी आम्हाला सहा कसोटी सामने मिळाले आहेत आणि पुढच्या वर्षी एकूम सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. अशात आपल्याला 100 कसोटी खेळण्यासाठी प्रत्येक सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील व्हावे लागेल.”

“आपण क्रेग ब्रेथवेट याच्याकडे उदाहरण म्हणून पाहू शकतो. एवढ्या वर्षांपासून खेलत आहे, पण त्याने 100 कसोटी खेळल्या नाहीत. क्रेग तर जो रूटच्या आधीपासून खेळत आहे, पण इंग्लिश खेळाडूने आतापर्यंत 130 कसोटी सामने खेळले आहेत. यावरून समजते की, इंग्लंड संघ आमच्या तुलनेत किती जास्त कसोटी खेळत आहे.” दरम्यान, ब्रेथवेटने 2011 मध्ये पदार्पण केले असून आतापर्यंत 83 कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने डिसेंबर 2012 मध्ये पदार्पण करून देखील 129 कसोटी सामने खेळले आहेत.

दरम्यान, आगामी वेळापत्रकानूसार वेस्ट इंडीज संघाला 24 कसोटी सामने खेळायचे आहेत. होल्डरला जर सोबर्सच्या 93 कसोटी सामन्यांचा विक्रम मोडायचा असेल, तर येत्या काळातील प्रत्येक कसोटी सामन्यात खेळावे लागू शकते, जे खूपच कठीण आहे. (Jason Holder’s Big Reaction About Test Cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लाईंग उस्मान! ख्वाजाच्या अविश्वसनीय कॅचने पालटला सामन्याचा नूर, व्हिडिओ पाहाच
ब्रेकिंग! इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने उरकला साखरपुडा, पार्टनरला किस करत जगाला सांगितली आनंदाची बातमी


Next Post
Photo Courtesy: Twitter

लय भारी! अफलातून झेल टिपत कॅप्टन स्मिथने दाखवला पुजाराला तंबूचा रस्ता, पाहा तो व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/ICC

रबाडाच्या तुफानी गोलंदाजीने सेंच्युरियन कसोटी तीन दिवसांत निकाली! वेस्ट इंडीजचा दारुण पराभव

Virat Kohli Umesh Yadav

"क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते", प्रमुख गोलंदाज म्हणतोय भारताला अजूनही विजयाची संधी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143