भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने चोख प्रत्युत्तर देत भारतीय संघाला ६ गडी राखून पराभूत केले होते. आज (२८ मार्च) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर ३३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात उतरलेल्या इंग्लंड संघाला पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का दिला.
या सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावांचा डोंगर उभा केला होता. ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघाकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांची जोडी मैदानात आली होती. तर भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमार याने गोलंदाजीची सुरुवात केली होती.
पहिल्या पाच चेंडूवर जेसन रॉयने आक्रमक फलंदाजी करत ३ चौकारांसह १४ धावा ठोकल्या होत्या. त्यांनतर प्रत्युत्तरात सहाव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने टाकलेला गूड लेंथ चेंडू जेसन रॉयला कळालच नाही. तोच चेंडू जेसन रॉयचा त्रिफळा उडवत निघून गेला.
— Cricsphere (@Cricsphere) March 28, 2021
भारतीय संघाची जोरदार फलंदाजी
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. रोहित शर्मा (३७) माघारी परतला तर शिखर धवनने (६७) धावांचे योगदान दिले. कर्णधार विराट कोहलीला (७) या सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. तसेच रिषभ पंत (७८) याने या सामन्यात देखील महत्वाची खेळी केली. हार्दिक पंड्याने (६४) आणि शार्दुल ठाकूर याने (३० ) धावांची खेळी केली. भारतीय संघाला ४८.२ षटकात सर्वबाद ३२९ धावा करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे वा! ४५ वर्षात भारताविरुद्ध असं पहिल्यांदाच घडलंय, इंग्लिश गोलंदाजांचा अनोखा कारनामा
‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ
जोस बटलरच्या अप्रतिम एकहाती झेलाने रोखले रिषभ पंतचे वादळ, पाहा व्हिडिओ