---Advertisement---

‘आर्चर, स्टोक्स टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नसणे लाजिरवाणे’, इंग्लंडच्या फलंदाजाचे मोठे वक्तव्य

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 6:47 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सध्या पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून सुपर१२ फेरीतील सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. हे सामने सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जेसन रॉयने जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जेसन रॉय सध्या अबूधाबीमध्ये सुरू असलेल्या टी -१० लीग स्पर्धेत दिल्ली बुल्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याने एका वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “मी असे मुळीच बोलणार नाही की, ही समस्या आहे. परंतु हे लाजिरवाणे आहे. ते दोघेही आता ठीक होण्याच्या मार्गावर आहेत.”

सॅम करन देखील आयपीएल स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाबाहेर झाला आहे. त्याचा मोठा भाऊ टॉम करनला संघात बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेकवर आहे. दुसरीकडे, उजव्या कोहलीच्या फ्रॅक्चरमुळे आर्चर संघाबाहेर आहे.

जेसन रॉयने पुढे म्हटले की, “जर तुम्ही इंग्लंड संघांची खोली पाहिली, तर या संघात प्रभावशाली खेळाडू आहेत. खेळाडूंनी सराव सामन्यात देखील चांगली कामगिरी केली आहे आणि ते खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे संधी मिळताच हे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात.”

इंग्लंडच्या फलंदाजांनी देखील आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी त्यांना संथ खेळपट्टीवर फलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागला होता. याबाबत बोलताना जेसन रॉय म्हणाला की, “मला असे मुळीच वाटत नाही. कारण त्यांनी प्रत्येक खेळपट्टीवर चांगली फलंदाजी केली आहे. खेळपट्टी संथआहे, पण ही समस्या नाही. आम्ही खूप सराव केला आहे आणि बरेच खेळाडू आयपीएल खेळले आहेत. प्रत्येक खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्याची क्षमता खेळाडूंमध्ये आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकातील आतापर्यंतचे शतकवीर; केवळ एका भारतीयाचा समावेश

कपिल देव यांच्या हेअर स्टाईलवर दोनवेळचा विश्वविजेेता कर्णधार झाला फिदा! दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---