मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या ५९व्या सामन्यात गुरुवारी (१२ मे) आमने- सामने होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवत पहिल्या षटकात २, तर दुसऱ्या षटकात एक विकेट घेतली. यादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एका खास विक्रमाची नोंद नावावर केली.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने पहिल्याच षटकार सीएसकेला दोन मोठे झटके दिले. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आला आणि त्याने देखील उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. बुमराहने टाकलेल्या या षटकात सीएसकेला एकही धाव मिळाली नाही आणि त्यांनी एक विकेट देखील गमावली. या निर्धाव षटकानंतर बुमराह मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज बनला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज होता. आता या यादीत मलिंगा आणि बुमराह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही आयपीएल कारकिर्दीत प्रत्येकी ८ निर्धाव षटके टाकली आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आहे, ज्याने आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करताना ५ निर्धाव षटके टाकली आहेत. ट्रेंट बोल्ट (Trent Boult) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने मुंबईसाठी ४ निर्धाव षटके टाकली आहेत.
दरम्यान, बुमराहने टाकलेले हे निर्धाव षटक सीएसकेच्या डावातील दुसरे, तर त्याच्या कोट्यातील पहिलेच षटक होते. त्याने या षटकार रॉबिन उथप्पाला पायचीत बाद केले. त्यापूर्वी डॅनियल सॅम्सने डावातील पहिल्या षटकात डेवॉन कॉनवे आणि मोईन अलीच्या रूपात दोन मोठ्या विकेट्स घेतल्या होत्या. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकांमध्ये केलेली कामगिरी पुढे देखील अशीच सुरू राहिली. सीएसकेचा संपूर्ण संघ अवघ्या ९७ धावांवर आणि १६ षटकांमध्ये गुंडाळला गेला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक तीर, तीन निशाणे! वॉर्नरने झटक्यात विराट, डिविलियर्स अन् गेलला टाकले मागे, पाहा पठ्ठ्याचा कारनामा
यंदाचा आयपीएल हंगाम ‘या’ ५ खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा, यादीत विस्फोटक पठ्ठ्यांचाही समावेश
कबड्डी खेळाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान मंजूर