---Advertisement---

“बुमराह माझ्यासाठी बेबी बॉलर”, पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूने केले मोठे भाष्य

On: बुधवार, डिसेंबर 4, 2019 7:59 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेकदा शानदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिले आहेत. तसेच बुमराह हा आयसीसीच्या कसोटी आणि वनडे क्रमवारीतही पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये आहे. त्याने आत्तापर्यंत केलेल्या अफलातून कामगिरीमुळे अनेक दिग्गजांच्या मते तो सध्याच्या काळातील एक सर्वोत्तम गोलंदाजही आहे.

मात्र पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने म्हटले आहे की तो बुमराहला सहज वरचढ ठरला असता. रज्जाकने क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या एका मुलाखतीत बुमराहला ‘बेबी बॉलर’ असे संबोधले आहे.

रज्जाक म्हणाला, ‘मी जगभरातील अनेक सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध खेळलो आहे. मला जसप्रीत बुमराह विरुद्ध खेळण्यास कोणतीही समस्या नाही. मी जर त्याच्या समोर असेल तर दबाव त्याच्यावर असेल. कारण जेव्हा तूम्ही ग्लेन मॅकग्रा, वासिम आक्रम आणि शोएब अख्तर अशा गोलंदाजांचा सामना करता तेव्हा तूम्हाला आत्मविश्वास मिळतो.’

‘माझ्यासाठी बुमराह बेबी बॉलर आहे. मी त्याला सहज वरचढ ठरु शकतो. जरी त्याला माहित असले की या खेळाडूने त्याच्यावेळीच्या सर्वोत्तम गोलंदांचा सामना केला आहे.’

तसेच पुढे रज्जाक बुमराहचे कौतुक करताने म्हटले आहे की तो सध्याच्या गोलंदाजांमधील चांगला गोलंदाज आहे. त्याचबरोबर बुमराहची अनोखी शैली त्याच्या यशाचे कारण असल्याचे म्हटले आहे.

रज्जाक म्हणाला, ‘बुमराह सध्याच्या खेळाडूंच्या दृष्टीने चांगली कामगिरी करत आहे आणि त्याने खूप सुधारणा केली आहे. त्याची गोलंदाजीची शैली थोडी विचित्र आहे आणि तो विचित्र धावतो. पण तो चेंडूची शिवण योग्यप्रकारे ठेवत ज्याप्रमाणे चेंडू सोडतो ते जबरदस्त आहे. त्यामुळे तो प्रभावी ठरत आहे.’

त्याचबरोबर रझ्झाक पुढे भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल म्हणाला की तो जरी चांगला फलंदाज असला तरी सचिन तेंडुलकरसारख्या फलंदाजांच्या श्रेणीत बसत नाही.

रज्जाक म्हणाला, ‘जर तुम्ही 1992 ते 2007 या कालावधीतील खेळाडूंशी बोललात तर ते क्रिकेट काय होते ते सांगतील. त्यावेळी जागतिक दर्जाचे खेळाडू होते. पण आता जागतिक दर्जाचे खेळाडू नाहीत. गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणात सखोलता नाही. हे सर्व आता मूलभूत झाले आहे.’

रज्जाक पुढे म्हणाला, ‘जसे विराट कोहलीने धावा केल्या तर त्या धावाच असतात. तो त्यांच्यासाठी चांगला खेळाडू आहे आणि तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, परंतु आपण त्याला सचिन तेंडुलकरसारख्या श्रेणीत स्थान देऊ शकत नाही. तो पूर्णपणे वेगळ्या प्रकारातील आहे.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---