आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ग्रुप स्टेजचा पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघात खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्ट रोजी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने अभियानाची सुरुवात करणार आहेत. परंतु याआधीच पाकिस्तान संघासाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर पडला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचे समोर आले होते.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) हे दोन्ही गोलंदाज त्यांच्या-त्यांच्या संघासाठी प्रमुख आहेत. संघाचे प्रमुख गोलंदाजच दुखापतीमुळे माघार घेत असल्यामुळे दोन्ही संघ कमजोर झाले आहेत. याच कारणास्तव संघांनी त्यांच्या गोलंदाजी आक्रमणात काही महत्वाचे बदल करावे लागले आहेत. असे असले तरी, आशिया चषकात (Asia Cup 2022) दोन्ही संघांच्या फलंदाजांची मात्र चांदी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पीसीबीने शनिवारी शाहीनच्या दुखापतीची माहिती दिली. २२ वर्षी शाहीनला मागच्या काही दिवसांपूर्वी मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना दुखापत झाली होती. गुडघ्याला झालेली ही दुखापत गंभीर असून त्यातून सावरण्यासाठी त्याला ४ ते ६ आठवड्यांचा वेळ लागू शकतो. तर दुसरीकडे बुमराह त्याच्या जुन्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तो सध्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सोबत बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहे. आगामी टी-२० विश्वचषकात देखील बुमराह खेळेल, याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत.
जसप्रीत बुमराच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याला टी-२० क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत एकूण २०८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये २५५ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहने ५८ सामन्यांमध्ये ६९ विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसरीकडे शाहीन आफ्रिदीची आकडेवारी देखील उत्तम आहे. ११९ टी-२० सामन्यांमध्ये शाहीनने १६५ विकेट्स घेतल्या आहेत. ४० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्याने एकूण ४७ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यंदा प्रत्येक घरात ‘या’ दिग्गजांचा आवाज घुमणार, वाचा आशिया चषकातील समालोचकांची संपूर्ण यादी
शार्दूलचा गोल्डन हँड अन् संजूच्या कामगिरीच्या जोरावर भारताचा मालिका विजय
VIDEO। चालू सामन्यात असं काही घडलं की इशान किशनने थेट अक्षर पटेलच्या डोक्यात बॉल मारला