भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याला खूप कमी वेळा रागावलेला पाहिले गेले आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मागच्या कसोटी सामन्यात असेच काही पाहायला मिळाले होते, जेव्हा मार्को जेन्सनसोबत (Marco Jansen) त्याचा वाद झाला होता. या वादाचा बदला बुमराहने तिसऱ्या कसोटी सामन्यात घेतला आहे. बदला घेतल्यानंतर बुमराहच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
उभय संघातील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने जेन्सनची विकेट घेऊन मागच्या सामन्याचा एकप्रकारे सूड घेतला. पहिल्या डावाच्या ६३ व्या षटकात बुमराह गोलंदाजीसाठी आला होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जेन्सन त्रिफळाचीत झाला. यावेळी जेन्सन सात धावांसह खेळपट्टीवर खेळत होता. जेन्सनला एक बचावात्मक शॉट खेळायचा होता, पण बुमराहचा चेंडू त्याला समजला नाही आणि तो एकदम ऑफ स्टंपला जावून लागला.
Off stump on a walk…
Bumrah rattles Jensen's wickets just before the Tea#SAvIND #INDvSA pic.twitter.com/dZm6VxfoVo
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) January 12, 2022
जेन्सनची विकेट घेतल्यानंतर बुमराहच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसू शकत होता. ही डावातील बुमराहने घेतलेली तिसरी विकेट होती आणि यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू पाहिले गेले होते. सोबतच कर्णधार विराटही उत्साहात दिसला होता.
https://twitter.com/realRahulsarsar/status/1481277056524894210?s=20
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1481252757726117888?s=20
बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात एकूण पाच विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त भारताच्या मोहम्मद शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकुरने एक विकेट घेतली. भारतीय संघ पहिल्या डावात २२३ धावांवर सर्वबाद झाला होता, तर दक्षिण अफ्रिका संघ पहिल्या डावात २१० धावांवर गुंडाळला गेला. सामन्याच्या पहिल्या डावात भारताने १३ धावांची आघाडी मिळवली आहे.
दुसऱ्या सामन्यात काय घडले होते –
दरम्यान, उभय संघातील दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह जेव्हा फलंदाजीसाठी आला होता, तेव्हा जेन्सनने सतत त्याच्या अंगावर चेंडू टाकले. एवढेच नाही, तर तो बुमराहला काहीतरी बोलला देखील होता. यानंतर बुमराह रागावलेला दिसला होता. त्यावेळी बुमराहला जेन्सनची गोलंदाजी खेळता आली नव्हती आणि त्याने विकेट गमावली होती. ही घटना दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातील ५४ व्या षटकात घडली होती. परंतु आता बुमराहने मागच्या डावात झालेल्या वादाचा हिशोब चुकता केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत रायझिंग चॅम्पियन संघाचा विजय
‘हे’ ५ अनकॅप्ड खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये करू शकतात पदार्पण, यादीत एक वेगवान गोलंदाजही सामील
व्हिडिओ पाहा –





