---Advertisement---

सुट्टीवर असलेल्या बुमराह अन् संजनाने लुटला युरो कप सेमीफायनलचा आनंद, पाहा व्हायरल फोटो

---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. अशातच जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशनचा देखील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी फुटबॉल सामना पाहण्यासाठी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच बुधवारी (०७ जुलै) जसप्रीत बुमराह पत्नी संजना गणेशेन या दोघांनी लंडनच्या वेंबले स्टेडियममध्ये युरो चषकाचा पहिला उपांत्य फेरी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. हा फोटो जसप्रीत बुमराहने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.(Jasprit bumrah and wife sanjana ganeshan attend semi final between Italy and Spain)

भारतीय खेळाडू १४ जुलैला लंडनमध्ये येणार एकत्र
भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना १४ जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र यावे लागणार आहे. इथे त्यांचा दोन आठवडा सराव शिबिर सराव शिबिर असणार आहे. त्यानंतर त्यांना ‘सिलेक्ट काउंटी इलेव्हेन’ विरुद्ध सराव सामना देखील खेळायचा आहे.

इटलीने पेनल्टी शूट आऊटमध्ये स्पेनला केले पराभूत
युरो चषकाच्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात इटलीने स्पेन संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले आहे. इटलीने तब्बल ९ वर्षानंतर अंतिम फेरी गाठली आहे. २०१२ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना स्पेन संघाने पराभूत केले होते. तसेच इटलीने १० व्या वेळेस मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. असा कारनामा करणारा इटली दुसरा संघ ठरला आहे. दोन्ही संघांमध्ये सामना १-१ ने बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूट आऊट करत या सामन्याचा निकाल लावण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

माजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर बनले भारताचे नवे क्रीडामंत्री, रवी शास्त्रींनी केले अभिनंदन

इंग्लंडने रचला इतिहास, डेनमार्कला २-१ने पराभूत करत तब्बल ५५ वर्षांनंतर गाठली फायनल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---